Krunal Pandya : गैरवर्तनाची तक्रार करुन टीम सोडणाऱ्याला कृणालची जादू की झप्पी, वादाच्या चर्चांना पूर्णविराम
आयपीएल 2022 (IPL-2022) स्पर्धेत 28 मार्च रोजी दोन नवीन संघ समोरासमोर होते. लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स (Lucknow Super Giants vs Gujarat Titans) हे दोन संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या मैदानात भिडले. या सामन्यात गुजरातने विजय मिळवला. रोमहर्षक सामन्यात गुजरातने दोन चेंडू राखून 159 धावांचे लक्ष्य गाठले.
मुंबई : आयपीएल 2022 (IPL-2022) स्पर्धेत 28 मार्च रोजी दोन नवीन संघ समोरासमोर होते. लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स (Lucknow Super Giants vs Gujarat Titans) हे दोन संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या मैदानात भिडले. या सामन्यात गुजरातने विजय मिळवला. रोमहर्षक सामन्यात गुजरातने दोन चेंडू राखून 159 धावांचे लक्ष्य गाठले. अर्थात सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही लखनौला विजय मिळाला नाही, पण काही खेळाडूंनी आपले काम चोख बजावले. त्यापैकी एक म्हणजे कृणाल पंड्या (Krunal Pandya). कृणालने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमक दाखवली. दरम्यान, मैदानात त्याने असे काही केले की त्याने लोकांची मनं जिंकली. लखनौच्या डावात तो शेवटच्या स्थानावर फलंदाजीसाठी आला आणि त्याने 13 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 21 धावा केल्या. यानंतर, त्याने किफायतशीर गोलंदाजी केली आणि चार षटकांच्या कोट्यात केवळ 17 धावा देत एक बळी घेतला.
विशेष म्हणजे या सामन्यात पंड्या बंधू आमनेसामने होते. कृणाल लखनौकडून खेळत असताना त्याचा धाकटा भाऊ हार्दिक गुजरातचा कर्णधार होता. आयपीएलमध्ये हे दोन्ही भाऊ वेगवेगळ्या संघांकडून खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी दोघेही मुंबई इंडियन्सकडून खेळायचे पण या मोसमात मुंबईने त्यांना संघात कायम ठेवले नाही आणि हे दोन्ही भाऊ वेगळे झाले.
धाकट्या भावाची विकेट
कृणालने या सामन्यातील पहिला चेंडू टाकला तेव्हा त्याचाच भाऊ त्याच्यासमोर होता. या भावांच्या युद्धात कोण बाजी मारतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यात मोठा भाऊ जिंकला. कृणालने 11 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिकला बाद केले. हार्दिकने कृणालच्या चेंडूवर षटकार मारण्यासाठी मोठा फटका लगावला. पण तो चेंडू बॅटवर नीट घेऊ शकला नाही आणि तो मनीष पांडेकडे झेल सोपवून माघारी परतला. हार्दिकने 28 चेंडूत 33 धावा केल्या. भावाला बाद केल्यानंतर कृणालही हसताना दिसला.
दीपक हुडाला मारली मिठी
हार्दिकला बाद करण्यापूर्वीच कृणालने असे काही केले होते की, लोक त्याचे कौतुक करू लागले आहेत. दुष्मंथा चमीराने पहिल्याच षटकात शुभमन गिलला बाद केले. दीपक हुडाने त्याचा झेल टिपला. तेव्हा दीपकजवळ उभ्या असलेल्या क्रुणालने त्याला मिठी मारली. हा क्षण अनेकांसाठी खूप आश्चर्यकारक होता कारण दीपक आणि कृणाल देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोद्याकडून खेळायचे पण त्यावेळी दीपकने क्रुणालवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आणि बडोद्याचा संघ सोडला होता.
Krunal Pandya gave a pat on Deepak Hooda’s back after he was out scoring a fifty. Great to see this, IPL is simply the best. pic.twitter.com/XhJkYCnRi2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 28, 2022
इतर बातम्या
SRH vs RR: हैदराबादकडे एकापेक्षा एक चांगले खेळाडू, रॉयल्सच्या दमदार खेळाडूंना रोखू शकेल सनरायझर्स?