महिला खेळाडूंकडे सेक्सची मागणी, कोचची क्लिप व्हायरल, टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूला दिलय ट्रेनिंग
Cricket coach Harendra Shah booked in sex scandal : जबानी अजून नोंदवण्यात आलेली नाही. कारण डॉक्टरांनुसार ते अजून बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीत.
Cricket News : डेहराडून क्रिकेट अकादमीत कोचिंग देणारे हरेंद्र शाह यांना पोलीस अटक करणार आहेत. लैंगिक शोषण, धमकावण आणि जातीवाचक शिव्या देण्याच्या आरोपाखाली पोलीस हरेंद्र शाह यांना अटक करणार आहेत. त्यांनी टीम इंडियाच्या दिग्गज महिला खेळाडूला क्रिकेटचे धडे दिले आहेत. हरेंद्र शाह यांच्यावर त्यांच्याच अकादमीच्या महिला खेळाडूंनी गंभीर आरोप केला आहे. हरेंद्र शाह यांनी सेक्शुअल फेव्हर मागतिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
हरेंद्र शाह हे 13 ते 18 वयोगटातील मुलींना क्रिकेट कोचिंग देतात. त्यांच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. एक क्लिप व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट कोच हरेंद्र शाह यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरोधात छेडछाड आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले आहेत.
शरीरसंबंधाची मागणी
हरेंद्र शाह यांच्या अंडर ट्रेनिंग घेणाऱ्या एका महिला खेळाडूसोबतच्या त्यांच्या चर्चेची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ते मुलीकडे शरीरसंबंधाची मागणी करताना तिला उद्देशून अपशब्द वापरताना ऐकू येतय. आत्महत्येत्या प्रयत्नानंतर त्यांना शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलय.
अजून बोलण्याच्या स्थिीमध्ये नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची जबानी घेण्यात आलेली नाही. कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ते अजून बोलण्याच्या स्थिीमध्ये नाहीयत. “आम्ही सर्व आरोपांची चौकशी करतोय. यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल” असं डेहराडूनचे एसएसपी दलीप सिंह कुंवर यांनी सांगितलं. तक्रार कोणी नोंदवली?
सोमवारी रात्री हरेंद्र शाह यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यांच्याच अकादमीत ट्रेनिंग करणाऱ्या एक मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. आपल्या मुलीसोबत अनेकदा छेडछाड झाल्याचा आरोप त्यांनी केला. हरेंद्र शाह यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 354 ए (लैंगिक शोषण), 506 (धमकी) आणि पॉक्सो कायद्याच्या 7 आणि 8 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.