DC vs MI Live Score, IPL 2022 : सोपे अवघड झाले हो… Mumbai Indians हरले ओ!
DC vs MI Live Score, IPL 2022 : आयपीएल 2022 च्या दुसऱ्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना (Delhi Capitals vs Mumbai Indians) होत आहे.
DC vs MI Live Score, IPL 2022 : ललित यादव (Lalit Yadav) आणि अक्षर पटेल (Axar patel) यांच्या जबरदस्त खेळाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2022 मध्ये विजयी सुरुवात केली आहे. खरंतर या सामन्यात एक वेळ अशी होती की, मुंबई इंडियन्स हा सामना सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हा सामना चार विकेटने गमावला. ललित यादव आणि अक्षर पटेलने सातव्या विकेटसाठी 30 चेंडूत नाबाद 75 धावांची भागीदारी केली. ललित यादव नाबाद (48) आणि अक्षर पटेलने नाबाद (38) धावा केल्या. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या होत्या. एकवेळ दिल्लीची अवस्था सहाबाद 104 अशी होती. पण अखेरीस त्यांनी 10 चेंडू राखून विजय मिळवला.
दोन्ही टीम्सची अशी आहे प्लेइंग इलेवन
दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, टिम सेइफर्ट, मंदीप सिंह, ऋषभ पंत, रोवमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, खलील अहमद, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, कायरन पोलार्ड, टिम डेविड, डेनियर सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बासिल थम्पी.
Key Events
दिल्ली कॅपिटल्सचं सामन्याआधी थोडं नुकसान झालं आहे. कारण त्यांचे अनेक परदेशी खेळाडू उपलब्ध नाहीयत. यात डेविड वॉर्नर, लुंगी निगिडीसारखे मोठे खेळाडू आहेत.
मुंबईला सामन्याआधी झटका बसला आहे. मधल्याफळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीय. तो अजूनही पूर्णपणे फिट नाहीय.
LIVE Cricket Score & Updates
-
मुंबईने जिंकायचा सामना हरला
सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. मुंबईने जिंकायचा सामना हरला. ललित यादव नाबाद (48) आणि अक्सर पटेल (38) विजयाचे नायक ठरले. दिल्ली कॅपिटल्सने चार विकेट राखून हा सामना जिंकला.
The spirit. The fight ?
What a knock, @LalitYadav03 ?#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #DCvMI#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/JOKx9fWnAD
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 27, 2022
-
मुंबई आणि दिल्लीचा सामना रंगतदार स्थितीत
मुंबई आणि दिल्लीचा सामना रंगतदार बनत चालला आहे. 17 षटकात दिल्लीच्या सहा बाद 150 धावा झाल्या आहेत. दिल्लीला विजयासाठी 18 चेंडूत 28 धावांची आवश्यकता आहे.
-
-
सध्या राज्यात वेगळ्या पद्धतीने राजकारण सुरू झालं आहे – जयंत पाटील
– सध्या राज्यात वेगळ्या पद्धतीने राजकारण सुरू झालं आहे
– अधिवेनात वेगळा अनुभव आला, आमच्या समोरची बाक खाली दिसली, मग समजलं की काश्मीर फाईल बघायला गेलीत मात्र रात्रीचा शो बघता आला असता,
– मात्र लोकांच्या प्रश्नाबाबत त्यांना रस नाही
– ज्या काश्मिरी नावानं मत मागता त्यांना घर बांधून द्या
– अशा पद्धतीने समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे
– बहुजनांनी सावध राहील पाहिजे
– काश्मिरी फाईलच्या उत्पन्नातुन काश्मिरी लोकांना घर बांधून द्या,
-
ईशानची शानदार कॅच!
फक्त बॅटिंगनेच नाही तर आपल्या शानदार किपिंग आणि फिल्डिंगनही ईशानं सगळ्यांना प्रभावित केलं, पृथ्वी शॉचा अप्रतिप झेल ईशाननं पकडला, मागच्या दिशेने उलट धावत जात हवेत उडी मारून ईशाननं ही शानदार कॅच पकडली
View this post on Instagram -
शार्दुल ठाकूर आऊट
चांगली फलंदाजी करणारा शार्दुल ठाकूर आऊट झाला आहे. बासील थम्पीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने त्याचा झेल घेतला. शार्दुल ठाकूरने 22 धावा केल्या. सहाबाद 113 अशी स्थिती आहे.
-
-
दिल्लीचे धावांचे शतक पूर्ण, शार्दुल ठाकूरची दमदार फलंदाजी
दिल्लीच्या शंभर धावा पूर्ण झाल्या आहेत. दिल्लीच्या 13 षटकात पाच बाद 105 धावा झाल्या आहेत. शार्दुल ठाकूर एकाबाजूने दमदार फलंदाजी करतोय.
-
पृथ्वी शॉ पाठोपाठ रोव्हमॅन पॉवेल आऊट, दिल्लीचा संघ अडचणीत
दमदार फलंदाजी करणारा पृथ्वी शॉ बाद झाला आहे. बासील थंपीच्या गोलंदाजीवर इशान किशनने त्याचा जबरदस्त झेल घेतला. पृथ्वी शॉ ने 38 धावा केल्या. पाठोपाठ रोव्हमॅन पॉवलेही तंबूत परतला. थंपीनेच या दोन्ही विकेट काढल्या. दिल्लीची स्थिती पाचबाद 72 आहे.
-
पृथ्वी शॉ बाद
दमदार फलंदाजी करणारा पृथ्वी शॉ बाद झाला आहे. बासील थंपीच्या गोलंदाजीवर इशान किशनने त्याचा जबरदस्त झेल घेतला. पृथ्वी शॉ ने 38 धावा केल्या. दिल्लीची स्थिती चार बाद 72 आहे.
-
जळगाव जिल्ह्यात 29 मार्च ते 31 मार्च 3 दिवस उष्णतेची लाट
जळगाव जिल्ह्यात 29 मार्च ते 31 मार्च 3 दिवस उष्णतेची लाट
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली शक्यता
उष्णतेच्या लाटेत उष्माघातापासून बचाव व उपायोजना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर
जिल्हा नियंत्रण कक्ष महानगरपालिका नियंत्रण कक्ष विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था व आरोग्य विभागास सतर्क राहण्याच्या सूचना
उष्माघाताच्या घटना टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था यांनादेखील उपाययोजना राबविण्याचे आपत्ती व्यवस्थापनाच्या आवाहन
-
पहिल्याच सामन्यात पहिली विकेट घेतल्यानंतर अश्विन मुरुगन
View this post on Instagram -
पृथ्वी शॉ ने सावरला डाव
दिल्ली कॅपिटल्सच्या आठ षटकात तीन बाद 62 धावा झाल्या आहेत. लागोपाठ तीन विकेट गेल्यानंतर पृथ्वी शॉ जबाबदारी अंगावर घेऊन फलंदाजी करत आहे. तो 33 धावांवर नाबाद आहे.
-
दिल्लीसमोर तगडं आव्हान
- 8 ओव्हरमध्ये दिल्लीच्या 62 धावा
- आठव्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर चौकार
- 72 चेंडूूत दिल्लीला विजयसाठी 116 धावांची गरज
- तीन विकेट्स गमावल्यानं दिल्लीचं आव्हानं वाढली
-
दिल्लीची मोठी विकेट
दिल्लीचा डाव अडचणीत सापडला आहे. कॅप्टन ऋषभ पंतही अवघ्या एक रन्सवर आऊट झाला. वेगवान गोलंदाज मिल्सने त्याला डेविड करवी झेलबाद केले.
-
मुरुगन अश्विन ऑन फायर
स्फोटक खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या टिम सायफर्टला अश्विनने क्लीन बोल्ड केलं आहे. सायफर्टने 21 धावा केल्या. त्यानंतर मनदीप सिंहला भोपळाही फोडू न देता तिलक वर्माकरवी झेलबाद केलं.
M Ashwin has another! ???
Mandeep departs after hitting one straight to Tilak at mid-on ?#DC: 30/2 (3.5)#OneFamily #MumbaiIndians #दिलखोलके #DCvMI #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2022
-
टिम सायफर्टचा जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर हल्लाबोल
दिल्लीच्या डावाला सुरुवात झाली आहे. दोन षटकात दिल्लीच्या बिनबाद 21 धावा झाल्या आहेत. टिम सायफर्ट 18 धावांवर खेळतोय. यात त्याचे चार चौकार आहेत.
-
दिल्लीला विजयासाठी दिलं 178 धावांच लक्ष्य
इशान किशनच्या दमदार फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 178 धावांच लक्ष्य दिलं आहे. इशानने 48 चेंडूत नाबाद 81 धावांची खेळी केली. यात 11 चौकार आणि दोन षटकार होते. मुंबईकडून आज डेब्यू करणाऱ्या सिंगापूरच्या टिम डेविड आणि तिलक वर्मानेही आपल्या छोटेखानी फलंदाजाने प्रभावित केलं. तिलकने 15 चेंडूत 22 धावा केल्या. यात तीन चौकार होते. टिम डेविडने आठ चेंडूत 12 धावा केल्या. यात एक षटकार होता.
????? – ??? ?????? ?#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #DCvMI @ishankishan51 pic.twitter.com/icqlYfB8eB
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2022
-
धोकादायक फलंदाज टिम डेविड आऊट
धोकादायक फलंदाज टिम डेविड आऊट झाला आहे. खलील अहमदची गोलंदाजी फटकावताना मनदीप सिंहकडे झेल दिला. त्याने 12 धावा केल्या. यात एक षटकार होता.
-
सिंगापूरच्या टीम डेविडने मारला सणसणीत षटकार
18 षटकात मुंबईच्या चार बाद 148 धावा झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या टीम डेविडने सरळ सणसणीत षटकार लगावला.
-
षटकार ठोकून हाफ सेंच्युरी पूर्ण
यंदाच्या मेगा ऑक्शनमधला महागडा खेळाडू इशान किशनने षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार लगावले.
5️⃣0️⃣ for our ?????? ??????
And what a shot to bring it up with ??? pic.twitter.com/V1gdeF1R4w
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2022
-
कुलदीप यादवने मुंबई इंडियन्सला दिला मोठा झटका
कुलदीप यादवने मुंबई इंडियन्सला मोठा झटका दिला आहे. मुंबईचा स्टार खेळाडू कायरन पोलार्डची विकेट काढली. पोलार्डने मिडविकेटला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण टिम सेइफर्टने त्याचा तीन धावांवर झेल घेतला. मुंबईची स्थिती चार बाद 122 आहे.
Pollard hoicked one to the leg side but Seifert pulled off a blinder at mid-wicket ?
Kuldeep gets his 3⃣rd ?#YehHaiNayiDilli #IPL2022 #DCvMI https://t.co/yupDBWilYF
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 27, 2022
-
22 धावा करुन तिलक आऊट, MI ला तिसरा धक्का
मुंबई इंडियन्सची तिसरी विकेट, MIला तिसरा धक्का, 22 धावा करुन तिलक आऊट, 117 धावांवर मुंबईच्या 3 विकेट्स, तिसरी विकेट पडल्यानंतर आता पोलार्ड मैदाना, ईशान किशन 45 धावांवर नाबाद
-
MIनं पार केला 100चा आकडा
12.5 ओव्हर्समध्ये मुंबईनं गाठला शंभरचा आकडा, 13व्या ओव्हरमध्ये तिलकचे दोन बॅक टू कॅब चौकार तर ईशान किशननं अखेरच्या चेंडूवर शानदार शॉट, दोन्ही डावखुरे फलंदाज मैदानात
-
कुलदीप चमकला! अनमोलप्रीत सिक्स मारण्याच्या नादात आऊट
दुसरी विकेट घेण्यातही कुलदीपला पुन्हा यश, अनमोलप्रीत सिक्स मारण्याच्या नादात आऊट, मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का, 11 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोअर 85-2
-
दुसरी विकेट जाता जाता राहिली…
रोहित शर्माची विकेट काढल्यानंतर अनमोलप्रित मैदानात, आपल्याच दुसऱ्या चेंडूवर स्ट्रेट डाईव्ह मारतात कुलदीपला दुसरी विकेट मिळणारच होती. मात्र कॅच घेण्यात थोडक्यात कुलदीप चुकला आणि अनमोलप्रीतच्या जिवात जीव आला आहे. फिरकीपटूंच्या आल्यानंतर मुंबईच्या धावांची गती हलकीशी मंदावली आहे.
-
हिटमॅन आऊट, मुंबई इंडियन्सला पहिला धक्का
रोहित शर्माला आऊट करण्यात कुलदीप यादवला यश, पुल शॉट मारण्याचा प्रयत्न फसला!
-
रोहित-इशानने दिल्लीच गणित बिघडवलं
रोहित-इशानने दिल्लीच गणित बिघडवलं. सहा षटकात मुंबई इंडियन्सच्या बिनबाद 53 धावा झाल्या आहेत. रोहित 30, इशान 22 धावांवर खेळतोय.
-
कमलेश नागरकोटीच्या गोलंदाजीवर हल्लाबोल
कमलेश नागरकोटीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने शानदार षटकार लगावला. पाच षटकात मुंबईच्या बिनबाद 48 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 25 आणि किशन 22 धावांवर खेळतोय. आतापर्यंत प्रत्येक षटकात दोघांनी चौकार-षटकार लगावले आहेत.
Slapped by Ishan over point, another 4⃣ to his name ?
1⃣6⃣ off this over ?#MI: 48/0 (5)#OneFamily #MumbaiIndians #दिलखोलके #DCvMI #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2022
-
इशान किशनची दमदार फलंदाजी
अक्सर पटेलच्या गोलंदाजीवर इशान किशनने शानदार चौकार लगावला. चार षटकाच मुंबई इंडियन्सच्या बिनबाद 32 धावा झाल्या आहेत. इशान किशन 18 धावांवर खेळत असून त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला आहे.
-
रोहित-इशानची आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी
शार्दुल ठाकूरच्या शेवटच्या चेंडूवर इशान किशनने चौकार लगावला. तीन षटकात मुंबईच्या बिनबाद 25 धावा झाल्या आहेत.
Another over ends with a 6⃣?#MI: 25/0 (3)#OneFamily #MumbaiIndians #दिलखोलके #DCvMI #TATAIPL https://t.co/9NBZ1b00en
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2022
-
इशान किशनने लगावला चौकार
दोन षटकात भारताच्या बिनबाद 16 धावा झाल्या आहेत. इशान किशनने खात उघडताना खलील अहमदला चौकार लगावला. रोहित 11, इशान पाच धावांवर खेळतोय.
Ro & Ishan are looking sharp in the middle ??#MI: 16/0 (2)#OneFamily #MumbaiIndians #दिलखोलके #DCvMI #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2022
-
पहिल्याच षटकात रोहितने ठोकला चौकार आणि षटकार
मुंबई इंडियन्सची रोहित शर्मा आणि इशान किशनची सलामीची जोडी मैदानात आहे. शार्दुल ठाकूरच्या पहिल्या षटकात 10 धावा निघाला. रोहितने एक चौकार आणि एक षटकार ठोकला.
Ends the over with a lofted drive over covers, for a maximum ??#MI: 10/0 (1)#OneFamily #MumbaiIndians #दिलखोलके #DCvMI #TATAIPL https://t.co/aFgLwLuYO1
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2022
-
अशी आहे दिल्लीची प्लेइंग इलेवन
दिल्ली कॅपिटल्स टीम- ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, टिम सेफर्ट, मंदीप सिंह, ऋषभ पंत, रोवमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, खलील अहमद, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी
-
अशी आहे मुंबईची प्लेइंग इलेवन
मुंबई इंडियन्स टीम- रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, कायरन पोलार्ड, टिम डेविड, डेनियर सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बासिल थम्पी.
Published On - Mar 27,2022 3:21 PM