AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी तुझी सर्वात मोठी…’ बर्थ डे ला शुभेच्छा देताना Yuzvendra Chahal ला पत्नीकडून खास संदेश

भारतीय संघाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) शनिवारी 23 जुलैला आपला 32 वा वाढदिवस साजरा केला. चहलला त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

'मी तुझी सर्वात मोठी...'  बर्थ डे ला शुभेच्छा देताना Yuzvendra Chahal ला पत्नीकडून खास संदेश
yuzvendra chahalImage Credit source: instagram
| Updated on: Jul 24, 2022 | 2:03 PM
Share

मुंबई: भारतीय संघाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) शनिवारी 23 जुलैला आपला 32 वा वाढदिवस साजरा केला. चहलला त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर (Soical Media) त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडला. पण या सगळ्यामध्ये चहलसाठी एक शुभेच्छा संदेश खूपच खास होता. युजवेंद्र चहलला या शुभेच्छा त्याची पत्नी धनश्री वर्माने (Dhanshree varma) दिल्या. धनश्रीने नवऱ्यासाठी खास भावनिक संदेश लिहिला व सोबत एक फोटोही शेयर केला.

ती त्याच्या पाठिशी उभी असते

धनश्री नेहमीच चहल सोबत दिसते. प्रत्येकवेळी ती त्याच्या पाठिशी उभी असते. सामन्यादरम्यान अनेकदा ती स्टेडियम मध्ये चहलसाठी चियर करताना दिसते. आयपीएल असो वा, आंतरराष्ट्रीय सामना धनश्री संधी मिळेल, तेव्हा ती त्याचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियम मध्ये पोहोचते. युजवेंद्र चहल सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहेत. तिथे तीन सामन्यांची वनडे सीरीज सुरु आहे.

मी तुमची सर्वात मोठी फॅन

धनश्रीने इन्स्टाग्रामवर पतीसाठी खास संदेश लिहिलाय. “आयुष्य एक प्रवास आहे. खऱ्याने अर्थाने ते सुंदर आहे. तुम्ही व्यक्ती म्हणून खूप चांगले आहात. देवाची कृपा नेहमीच तुमच्यावर राहूं दे. युजवेंद्र चहल वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुमची सर्वात मोठी फॅन आहे” असं धनश्री शुभेच्छा संदेशात लिहिलं आहे.

दोघांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली?

चहल आणि धनश्रीची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. कोविडमुळे लॉकडाउन होता. त्यावेळी चहलने डान्स शिकायचं ठरवलं. धनश्री नृत्य शिक्षिका आहे. चहलने डान्स शिकण्यासाठी धनश्रीशी संपर्क साधला. डान्स शिकताना आणि शिकवताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केलं.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.