ODI World cup 2023 : 50 ओव्हर्सचा हा शेवटचा वर्ल्ड कप? क्रिकेटमध्ये नवीन फॉर्मेट येणार?

ODI World cup 2023 : यंदा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंट होणार आहे. वनडे फॉर्मेटला जिवंत ठेवण्यासाठी त्यात बदल आवश्यक आहे. वनडे क्रिकेटमध्ये 40 ओव्हर्सचे सामने खेळवण्याचा सल्ला त्यांनी दिलाय.

ODI World cup 2023 : 50 ओव्हर्सचा हा शेवटचा वर्ल्ड कप? क्रिकेटमध्ये नवीन फॉर्मेट येणार?
Rohit-HardikImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 1:49 PM

ODI World cup 2023 : क्रिकेटमध्ये नवीन फॉर्मेट येणार आहे का? वनडे क्रिकेटमध्ये बदल होणार आहे का? आता वनडे सामने 40 ओव्हरचे होणार? या प्रश्नांची उत्तर मिळणं सध्या कठीण आहे. पण बदलांची चर्चा जरुर सुरु झालीय. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांच्या मते, वनडे फॉर्मेटला जिवंत ठेवण्यासाठी त्यात बदल आवश्यक आहे. वनडे क्रिकेटमध्ये 40 ओव्हर्सचे सामने खेळवण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. शास्त्रींच्या या मताच दिनेश कार्तिकने सुद्धा समर्थन केलय.

वनडे क्रिकेट आता तेवढ आकर्षक राहिलेलं नाहीय. त्याच महत्त्व कमी होतय. यावर्षी भारतात होणार 50 ओव्हर्सचा वर्ल्ड कप शेवटचा वर्ल्ड कप ठरु शकतो. रवी शास्त्री आणि दिनेश कार्तिक असं का बोलतायत? ते जाणून घेऊया.

रवी शास्त्री काय म्हणाले?

टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री म्हणाले की, “वनडे क्रिकेट वाचवण्यासाठी भविष्यात ओव्हर कमी करुन 40-40 ओव्हर्सचे सामने खेळवावेत” “1983 साली आम्ही वर्ल्ड कप जिंकला, त्यावेळी 60 ओव्हर्सच्या मॅचेस होत्या. लोकांचा रस कमी होऊ लागल्यानंतर 50 ओव्हर्सचा खेळ झाला. मला वाटतं आता, 40 ओव्हर्सचे सामने खेळवण्याची वेळ आलीय. वेळेबरोबर बदल गरजेचा आहे” असं रवी शास्त्री म्हणाले.

वनडे क्रिकेट बोरिंग?

दिनेश कार्तिकने रवी शास्त्रींच समर्थन केलं. “लोकांना टेस्ट क्रिकेट पहायच आहे. तो क्रिकेटचा उत्तम फॉर्मेट आहे. टी 20 क्रिकेट लोक मनोरंजनासाठी पाहतात. पण 50 ओव्हर्सचा खेळ बोरिंग व्हायला लागलाय. लोकांना 7 तास थांबून मॅच पाहण्याची इच्छा नाहीय” असं दिनेश कार्तिक म्हणाला. त्यामुळे कार्तिकलाही वाटतय की, भारतात होणारा 50 ओव्हर्सचा वनडे वर्ल्ड कप शेवटचा ठरेल. रवी शास्त्री आणि दिनेश कार्तिक यांच हे म्हणण कितपत योग्य आहे आणि आयसीसी या बद्दल काय विचार करते, ते लवकरच समजेल.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.