विनोद कांबळी याच्या या होंडा कारचा वाद तुम्हाला माहिती आहे काय? काय झाले होते नेमके ?
विनोद कांबळी भारताचा माजी क्रिकेटपटू सध्या चर्चेत आहे. त्याची विपन्नावस्था जगासमोर आल्याने क्रिकेट सारख्या ग्लॅमर, पैसा आणि प्रसिद्धी आणि चकाचक आयुष्य असणाऱ्या खेळाडूची अशी अवस्था का झाली याविषयी चर्चेला पेव फुटले आहे.
विनोद कांबळी यांच्या जीवनात सध्या काही बरे चालले आहे असे त्याच्या अलिकडील सचिन तेंडुलकर सोबतच्या व्हिडीओवरुन जगाला कळले. सोशल मीडियात विनोद कांबळी याच्या कहाण्यांनी भरला आहे. आता आम्ही तुम्हाला विनोद कांबळी याच्या होंडा कारच्या वादाबाबत माहिती देणार आहोत. या प्रकरणात विनोद कांबळी याच्यावर पोलिस केस देखील झाली होती. विनोद कांबळी याने मद्यपान करुन ड्रायव्हिंग केले होते का? त्याने कोणत्या कारला ठोकरले होते? या केसमध्ये विनोद कांबळी याला अटक देखील करण्यात आली होती. चला तर पाहूयात या प्रकरणाची सगळी माहिती…नेमके काय घडले होते.
कांबळीला का झाली होती अटक?
विनोद कांबळी याच्या गत आयुष्यात अनेक घटना अशा घडल्या आहेत की त्यामुळे तो कायम चर्चेत राहीलेला आहे. विनोद कांबळीला ऑनलाईन स्कॅममध्ये लाखोंचा फटाका देखील बसला होता. कांबळी मद्याच्या नशेत धुंद होऊन कार चालवताना देखील पकडला गेला होता. त्याने नशेत आपल्या सोसायटीत उभ्या असलेल्या कारला ठोकर देखील मारली होती. त्या प्रकरणात विनोद कांबळी याच्यावर भारतीय दंड संहिता कलम २७९ ( बेपर्वा कार चालविणे ), ३३६ ( अन्य लोकांच्या जीवाला सुरक्षेला धोका निर्माण करणे ) आणि ४२७ ( नुकसान होईल अशी आगळीक करणे ) अशा कलमांखाली वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्याला लागलीच जामीन देखील मिळाला होता.
विनोद कांबळी कोणती कार चालवित होता?
विनोद कांबळी याने Honda City Sedan कारने MG Hector ( SUV ) कारला जोरदार ठोकर मारली होती. ही एमजी हेक्टर कार त्यांच्या सोसायटीत पार्क केली होती. या दोन्ही कारची तुलना केली तर दोन्ही कारमध्ये खुपच अंतर आहे.
होंडा सिटी सेडानची ऑन-रोड सुरुवातीची किंमत १२.०८ लाख रुपये आहे. तर हीच्या टॉप मॉडेलची किंमत १६.३५ लाख रुपयांपर्यंत आहे.. होंडा सिटी कारला १४९८ सीसीचे इंजिन आहे. यात दोन ट्रांसमिशन मिळतात. ही कार १६ वेरिएंट्समध्ये बाजारात उपलब्ध आहे.
एमजी हेक्टरला मारली होती टक्कर
एमजी हेक्टरची सुरुवातीची किंमत १४ लाख रुपये आहे. तिची किंमत २२.७० लाखापर्यंत जाते. ही ५ सिटर एसयुव्ही आहे. बाजारात तिचे २४ व्हेरिएंट उपलब्ध आहेत. ही कार १४५१ सीसी आणि १९५६ सीसी इंजिन्सच्या पर्यायात उपलब्ध आहे.एमजी हेक्टर मॅन्युअल आणि ऑटोमेटीक अशा दोन्ही ट्रान्समिशनच्या पर्यायांमध्ये मिळते.