VIDEO : युसूफ पठानची एक चाल Mumbai Indians वर पडली भारी, 7 SIX, 9 फोर, 122 रन्स, मॅचच फिरली
लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळी दुबई टीमच्या 44 धावात 3 विकेट गेल्या होत्या. MI Emirates च्या विजयाची शक्यता वाटत होती. पण शनाका आणि रजाने कमाल केली. MI Emirates वर दुबई कॅपिटल्सचे दोन बॅट्समन भारी पडले.
दुबई : इंटरनॅशनल T20 लीगमध्ये दुबई कॅपिटल्सने आपल्यपेक्षा वरच्या रँकिंगवर असलेल्या MI Emirates ला पराभूत केलं. रविवारी सामना झाला. MI Emirates ने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 164 धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात दुबई कॅपिटल्सने 11 चेंडू आणि 7 विकेट राखून सामना जिंकला. MI Emirates वर दुबई कॅपिटल्सचे दोन बॅट्समन भारी पडले. दसुन शनाका आणि सिकंदर रजाने तडाखेबंद अर्धशतकं झळकवली. त्यांनी दुबई कॅपिटल्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दुबईच्या या दोन टीम्सनी शतकी भागीदारी करुन आपल्या टीमला विजय मिळवून दिला.
70 चेंडूत 122 धावांची पार्ट्नरशिप
लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळी दुबई टीमच्या 44 धावात 3 विकेट गेल्या होत्या. MI Emirates च्या विजयाची शक्यता वाटत होती. पण शनाका आणि रजाने कमाल केली. दोघांनी तडाखेबंद खेळ दाखवला. त्यांनी 7 सिक्स आणि 9 फोर मारले. दोघांमध्ये 70 चेंडूत 122 धावांची भागीदारी झाली.
Shunning the hopes of the opposition bit by bit!
That’s the commendable @dasunshanaka1 , the STAR player of today’s #DCvMIE match!
58 not out, in 36 balls comprising of five 4️⃣s and three 6️⃣s #DPWorldILT20 #ALeagueApart pic.twitter.com/q6R1tTXost
— International League T20 (@ILT20Official) February 5, 2023
युसूफ पठानची अनपेक्षित चाल
युसूफ पठानला या मॅचमध्ये दुबई कॅपिटल्सच्या कॅप्टनशिपची जबाबदारी मिळाली होती. त्याने या मॅचमध्ये एक चाल खेळून मुंबई इंडियन्स एमिराट्सला आश्चर्याचा धक्का दिला. युसूफने सहाव्या नंबरवर बॅटिंगला येणाऱ्या शनाकाला तिसऱ्या नंबरवर बॅटिंगला पाठवलं. हा निर्णय टीमच्या फायद्याचा ठरला. शनाकाने आपल्या टीमला निराश केलं नाही. शनाकाने शानदार अर्धशतक झळकवलं. रोव्हमॅन पॉवेल शुन्यावर बाद झाल्यानंतर सिकंदर रजासोबत मिळून त्याने शतकी भागीदारी केली.
याआधी गोलंदाजीत जेक बॉलने 3 आणि जंपाने 2 विकेट काढल्या. रजाने गोलंदाजीतही दम दाखवला. त्याने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन एक विकेट काढला. शनाकाला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. IL T20 मध्ये पॉइंट्स टेबल
इंटरनॅशनल टी 20 लीगच्या पॉइंट्स टेबलमध्ये गल्फ जायंट्स नंबर 1 पोजिशनवर आहे. त्यांनी 9 पैकी 6 मॅचेस जिंकल्या आहेत. डेजर्ट वायपर्सने 10 पैकी 7 सामने जिंकलेत. मुंबईच्या टीमचा पराभव झाला. पण 10 पैकी 5 सामने जिंकून ते तिसऱ्या स्थानावर आहेत.