Rishabh Pant : ऋषभ पंतची चाबूक खेळी, दुलीप ट्रॉफी स्पर्धेत शानदार अर्धशतक, पाहा व्हीडिओ
Rishabh Pant Fifty : ऋषभ पंतला पहिल्या डावात काही खास करता आलं नाही. मात्र पंतने दुसऱ्या डावात तो काय आहे, हे दाखवून देत चाबूक अर्धशतकी खेळी केली.
दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्यात बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबईकर मुशीर खान याने पहिल्या डावात 181 धावांची खेळी करत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर आता टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर ऋषभ पंत याने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात चाबूक अर्धशतकी खेळी केली. पंत पहिल्या डावात अपयशी ठरला होता. पंत 7 धावा करुन आऊट झाल्याने त्याच्यावर सडकून टीका करण्यात आली होती. मात्र पंतने दुसऱ्या डावात नेहमीच्या अंदाजात अर्धशतक करत टीकाकारांचा चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पंतने या अर्धशतकी खेळीसह निवड समितीचंही लक्ष वेधून घेतलं. दुलीप ट्रॉफीनंतर टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध कसोटी आणि टी 20i मालिका खेळणार आहे. पंतने या अर्धशतकासह कसोटी मालिकेसाठी आपला दावा मजबूत केला आहे.
पंतला बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेत संधी मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पंत कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून होतं. मात्र पंतला पहिल्या डावात त्याच्या लौकीकाला साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरला. मात्र पंतने दुसऱ्याच डावात तडाखेदार खेळी केली. इंडिया बी संघाची 3 बाद 22 अशी स्थिती झाली. त्यानंतर पंत मैदानात उतरला. पंतने टीमचा डाव सावरण्यासह आक्रमक खेळीत करत अवघ्या 34 चेंडूत अर्धशतक झळकावलं. पंतच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील ही दुसरं वेगवान अर्धशतक ठरलं. मात्र पंतला अर्धशतकानंतर फार वेळ मैदानात टिकून राहता आलं नाही. पंतने 47 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली.
दरम्यान पंतने बॅटिंगआधी अप्रतिम विकेटकीपिंग केली. पंतने दुसऱ्या दिवशी नवदीप सैनीच्या बॉलिंगवर मयंक अग्रवाल याचा उडी मारत अप्रतिम कॅच पकडला. मयंकने लेग स्टंपच्या दिशेने जाणारा बॉल मागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र पंतने उडी घेत कॅच घेतला.
पंतचा अर्धशतकी धमाका
50 for Rishabh Pant! 👌
He brings it up off just 34 balls 🔥#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/eQyu38DTlt pic.twitter.com/OPSfsvFhqI
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 7, 2024
इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, आवेश खान आणि खलील अहमद.
इंडिया बी प्लेइंग ईलेव्हन: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि यश दयाल.