Video : ऋषभ पंतने कुलदीप यादवला भर मैदानात डिवचलं! सरळ सांगितलं की, ‘मग घे आईची शपथ’

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया बी संघात सामना झाला. हा सामना बी संघाने 76 धावांनी जिंकला. या सामन्यात ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्यात एक गंमतीशीर प्रकार पाहायला मिळाला. कुलदीप यादव इंडिया ए कडून खेळत होता. तर ऋषभ पंत इंडिया बी संघाकडून खेळत होता. सामन्याच्या शेवटच्या दिवशी हा प्रकार घडला.

Video : ऋषभ पंतने कुलदीप यादवला भर मैदानात डिवचलं! सरळ सांगितलं की, 'मग घे आईची शपथ'
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 7:46 PM

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने पार पडले आहेत. इंडिया सी संघाने इंडिया डी संघाला आणि इंडिया बी संघाने इंडिया ए संघाला पराभूत केलं. पण इंडिया ए आणि इंडिया बी या सामन्यात मजेशीर प्रकार घडला.  रेड बॉल क्रिकेटमध्ये 21 महिन्यांनी पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतने सर्वांचं ल वेधून घेतलं. पहिल्या डावात फेल गेल्यानंतर दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी केली आणि 61 धावा केल्या. त्यानंतर चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऋषभ पंत गिलच्या स्ट्रॅटर्जी प्लानमध्ये सहभागी झाला होता. विरोधी संघात असूनही ऋषभ पंतची असं वागणं पाहून क्रीडाप्रेमींच्या चेहऱ्यावर हसू आलं. दुसऱ्या डावात इंडिया ए संघाची फलंदाजी सुरु असताना ऋषभ पंतचं काही वेगळंच सुरु होतं. ऋषभ पंतने कुलदीप यादव भर मैदानात आव्हान दिलं आणि लवकर आऊट होण्यासाठी डिवचलं. विकेटकीपिंग करत असताना त्याचं हे म्हणणं स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं आणि आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली इंडिया ए संघ पराभवाच्या वेशीवर होता. तेव्हा फलंदाजीसाठी क्रिझवर कुलदीप यादव होता. टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना कुलदीप आणि पंत यांच्यात चांगला तालमेल आहे. दोघं कायम एकमेकांची मस्करी करत असतात. यावेळी असंच चित्र पाहायला मिळालं. कुलदीप यादव जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा पंतने विकेट मागून सांगितलं की सिंगल घेऊ द्या. लगेचच कुलदीपने उत्तर दिलं आणि सांगितलं की, एक धाव घेणार नाही. पंतने त्याला पटकन उत्तर दिलं आणि म्हणाला, मग आईची शपथ घे आणि सांग की एक धाव घेणार नाही.

ऋषभ पंत इतक्यावरच थांबला नाही. कुलदीप यादवने मैदानात तग धरत असल्याचं पाहून बोलण्यास सुरुवात केली. पंतने पुन्हा एकदा सांगितलं की, कुलदीपला एक धाव घेऊ द्या कारण की त्यांनी तगडा प्लान बनवला आहे. याला उत्तर देताना कुलदीपने सांगितलं की,  चिंताग्रस्त का आहेस? ऋषभ पंतने लगेच उत्तर दिलं आणि म्हणाला की, लवकर आऊट हो. हे ऐकून सर्वच हसायला लागले.

ऋषभ पंतने अखेर कुलदीप यादवला विचलीत केलं आणि 14 धावांवर असताना वॉशिंग्टन सुंदरने त्याची विकेट काढली. मुशीर खानने त्याचा झेल पकडला.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.