Dhoni Wife Sakshi IPL 2023 : धोनीची बायको साक्षीचा मिस्ट्री फ्रेंड कोण? दोघांचा फोटो व्हायरल
Dhoni Wife Sakshi IPL 2023 : साक्षीच्या त्या मिस्ट्री फ्रेंडच नाव काय? साक्षीचा हा मिस्ट्री फ्रेंड कुठे राहतो? त्या लग्नात सुद्धा साक्षी सोबत होती. साक्षी या मिस्ट्री फ्रेंडचा गाल खेचताना दिसतेय.
नवी दिल्ली : एमएस धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्ससाठी कालचा सामना ‘करो या मरो’ होता. प्लेऑफ राऊंडमध्ये दाखल होण्यासाठी काहीही करुन चेन्नईला दिल्ली कॅपिटल्सवर विजय आवश्यक होता. या महत्वाच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड (79) आणि डेवॉन कॉनवे (87) यांची बॅट तळपली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर 77 धावांनी मोठा विजय मिळवला. चेन्नईचा कॅप्टन धोनीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.
चेन्नई सुपर किंग्सने निर्धारित 20 ओव्ह्रर्समध्ये 3 बाद 223 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने 9 बाद 146 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईने ही मॅच 77 धावांनी जिंकली.
पत्नी साक्षी सुद्धा आलेली
चेन्नईची टीम आता क्वालिफाय 1 मध्ये मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे. चेन्नईची टीम ही मॅच जिंकली, तर ते थेट फायनलमध्ये प्रवेश करतील. या मॅचमध्ये धोनीला सपोर्ट करण्यासाठी त्याची पत्नी साक्षी धोनी सुद्धा स्टेडियममध्ये उपस्थित होती.
साक्षीच्या त्या मिस्ट्री फ्रेंडच नाव काय?
साक्षी नेहमीच आयपीएल सामन्यांच्यावेळी प्रेक्षक स्टँडमधून सपोर्ट करताना दिसते. काल साक्षी धोनी सोबत तिचा एक मित्र होता. या मिस्ट्री फ्रेंडची चर्चा आहे. काल चेन्नईचा दिल्ली विरुद्ध सामना पाहण्यासाठी साक्षीसोबत तिचा मित्र कबीर बाहिया उपस्थित होता.
View this post on Instagram
साक्षीचा हा मिस्ट्री फ्रेंड कुठे राहतो?
साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कबीर बाहिया सोबतचा फोटो शेयर केलाय. यात ती कबीरचे गाल खेचताना दिसतेय. कबीर बाहियाच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलनुसार, तो लंडनमध्ये राहतो. त्याच्या लिंकडिन प्रोफाइलनुसार, तो वर्ल्डवाइड एविएशन अँड टूरिजम नावाच्या कंपनीत काम करतो. त्या लग्नात सुद्धा साक्षी सोबत होती
कबीरने 2 वर्षापूर्वी या कंपनीचे सेटअप केला. एका न्यूज रिपोर्ट्नुसार, तो ब्रिटनच्या एका प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा आहे. कबीर बाहिया याआधी हार्दिक पंड्याच्या लग्नात सुद्धा दिसला होता. या फोटोमध्ये सुद्धा त्याच्यासोबत साक्षी धोनी आहे. कबीर बाहियाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सुद्धा एमएस धोनी सोबतचे अनेक फोटो शेयर केले आहेत. कबीर इन्स्टाग्रामवर खूप Active आहे. त्याचे 27 हजार फॉलोअर्स आहेत.