AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 दरम्यान टीम इंडियाचे खेळाडू खास GPS डिवाइस घालूनच मैदानात उतरतील, कारण….

IPL 2023 News : इंडियन प्रीमिअर लीग 2023 दरम्यान टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूच्या वर्कलोडवर नजर ठेवली जाईल. टुर्नामेंट दरम्यान सर्वच खेळाडूंना एक खास जीपीएस डिवाइस घालाव लागेल.

IPL 2023 दरम्यान टीम इंडियाचे खेळाडू खास GPS डिवाइस घालूनच मैदानात उतरतील, कारण....
Team india Image Credit source: AFP
| Updated on: Mar 30, 2023 | 1:49 PM
Share

IPL 2023 News : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठ्या IPL लीगची सुरुवात 31 मार्चपासून होणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारतातील टॉप क्रिकेटर्सही आपल्या टीमला जिंकवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. टीम इंडियाच्या खेळाडूंवर बीसीसीआयची खास नजर असेल. आयपीएल दरम्यान भारतीय खेळाडूंना दुखापती होऊ नयेत, यासाठी बीसीसीआयने खास व्यवस्था केली आहे.

आयपीएल नंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात वर्ल्ड कप सुद्धा आहे. बीसीसीआयला आपल्या खेळाडूंना दुखापतींपासून वाचवायच आहे.

मॅच दरम्यानही हे जीपीएस डिवाइस

बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना दुखापतीपासून वाचवण्यासाठी वर्कलोड मॅनेजमेंटचा निर्णय घेतला आहे. आय़पीएल दरम्यान सर्वच खेळाडूंच वर्कलोड मॅनेज केलं जाईल. रिपोर्ट्सनुसार, भारतीय टीमचे बहुतांश खेळाडू जीपीएस डिवाइस घालून मैदानात उतरतील. प्रॅक्टिसच नाही, मॅच दरम्यानही हे जीपीएस डिवाइस खेळाडूंकडे असेल. यामुळे काय होणार? ते जाणून घ्या.

या डिवाइसमुळे काय होणार?

फिटनेसवर नजर रहावी, यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंना हे जीपीएस डिवाइस घालाव लागेल. या डिवाइसच्या माध्यमातून खेळाडूंची एनर्जी लेव्हल, हार्टबीट, ब्लड प्रेशर समजणार आहे. एकूणच या डिवाइसमुळे खेळाडूंना कधी आरामाची गरज आहे? कधी ते पूर्णपणे फिट आहेत? ते समजेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची टीम या डिवाइसचा वापर करते. भारतात हॉकी टीमचे खेळाडू या डिवाइसचा वापर करतात. अलीकडे WPL दरम्यान भारतीय खेळाडूंनी हे डिवाइस घातलं होतं. तिथे यश मिळाल्यानंतरच आयपीएलमध्ये याचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक खेळाडूंना दुखापती

बीसीसीआयला आपल्या खेळाडूंना दुखापतीपासून वाचवायच आहे. जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्ये खेळू शकणार नाहीत. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच मोठं नुकसान झालय. तो आशिया कप त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप मध्ये खेळू शकला नाही. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यानंतर वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणं मुश्किल दिसतय. या डिवाइसमुळे टीम इंडियाचा किती फायदा होतो? ते लवकरच समजेल.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.