AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli IPL 2023 : WTC फायनलआधी टीम इंडियाला टेन्शन, विराट कोहलीला दुखापत ?

Virat Kohli IPL 2023 : टीम इंडियाला मोठा फटका बसू शकतो. कारण आयपीएल 2023 चा सीजन संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडला रवाना होणार आहे. टीम इंडिया ICC WTC च्या फायनलमध्ये खेळणार आहे.

Virat Kohli IPL 2023 : WTC फायनलआधी टीम इंडियाला टेन्शन, विराट कोहलीला दुखापत ?
Virat Kohli IPL 2023Image Credit source: BCCI
| Updated on: May 22, 2023 | 10:51 AM
Share

बंगळुरु : Virat Kohli आयपीएलच्या चालू सीजनमध्ये जबरदस्त खेळला. मागच्या 15 वर्षात विराटने आयपीएलमध्ये 7 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 7 सेंच्युरी त्याने ठोकल्या. पण निकाल बदलले नाहीत. विराट कोहलीला पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दु:ख मिळालं. IPL 2023 मध्ये प्लेऑफ तिकिट चुकलच. पण 16 व्या सीजनमध्ये सुद्धा ट्रॉफी जिंकण्याच स्वप्न भंगलं. त्याशिवाय विराट कोहलीच्या वेदनेमुळे लोकांच टेन्शन वाढलय.

बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शेवटच्या लीग मॅचमध्ये विराट कोहलीने फॅन्सच खूप मनोरंजन केलं. त्याने धुवाधार बॅटिंग केली. गुजरात टायटन्स विरुद्ध शानदार सेंच्युरी झळकवली. या शतकाचा तसा फायदा झाला नाही. मनासारखा निकाल लागला नाही. कारण बँगलोर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली.

फक्त पराभवाचच दु:ख नाहीय

या पराभवाच दु:ख विराट कोहलीसह RCB च्या सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. सोशल मीडियावर सुद्धा विराटच्या चाहत्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं. पराभवाच्या दु:खासह विराटला दुखापतीच सुद्धा टेन्शन आहे. विराट कोहलीला कालच्या मॅचमध्ये दुखापत झाली.

कधी झाली दुखापत?

बँगलोरच्या टीमने गुजरातच्या फलंदाजांना लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी आपल्याबाजूने सर्व प्रयत्न केले. कोहलीने सुद्धा आपल्याबाजूने सर्व प्रयत्न करत होता. 15 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर कोहलीने विजय शंकरची कॅच पकडली. या प्रयत्नात विराटचा गुडघा मैदानात आपटला.

दुखापत कितपत गंभीर

कॅच पकडल्यानंतर विराट वेदनेने विव्हळत होता. त्याला चालताना अडचण येत होती. त्यामुळे कोहली मॅच संपेपर्यंत डगआऊटमध्ये बसून होता. डग आऊटमध्ये बसूनच विराटला टीमचा पराभव पाहावा लागला. आता प्रश्न हा आहे की, विराटला झालेली दुखापत कितपत गंभीर आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढतील का? हा मुख्य मुद्दा आहे. टीम इंडियासाठी पुढचा सामना महत्वाचा

आयपीएलचा सीजन 28 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर 7 जून पासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये ही मॅच होईल. आधीच टीम इंडियाचे काही खेळाडू दुखापतीमुळे खेळणार नाहीयत. त्यात विराट कोहलीच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच टेन्शन नक्कीच वाढू शकतं.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.