Kavya maran IPL 2023 : मॅच सुरु असताना भडकली काव्या मारन, नेमकं काय झालं? VIDEO
Kavya maran IPL 2023 : काव्या मारन हा आयपीएलमधला चर्चित चेहरा आहे. नेहमीच कॅमेऱ्याची तिच्यावर नजर असते. सोशल मीडियावर काव्या मारनची मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिच्या अदा नेहमीच चर्चेचा विषय असतो.
Kavya maran IPL 2023 : आयपीएलमध्ये नेहमीच फ्रेंचायजी मालक आपआपल्या टीमला सपोर्ट् करण्यासाठी स्टेडियममध्ये हजर असतात. शाहरुख खान, प्रिती झिंटा नेहमीच स्टेडियममध्ये दिसतात. सनरायजर्स हैदराबादची मालक काव्या मारनही त्यापैकीच एक आहे. काव्या जेव्हा कधी स्टेडियममध्ये असते, तेव्हा कॅमेऱ्याची सतत तिच्यावर नजर असते. आयपीएल 2023 मध्ये हैदराबादचा सामना रविवारी पंजाब किंग्स बरोबर होता. ही मॅच पहायला काव्या मारन पोहोचली होती.
हैदराबादने आयपीएलच्या चालू सीजनमध्ये चांगली सुरुवात केली नव्हती. या टीमला सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. तिसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध होता. या मॅचमध्ये हैदराबादने 8 विकेटने विजय मिळवला.
काव्याला का राग आला?
ही मॅच पहायला काव्या मारन उपस्थित होती. सामन्यादरम्यान कॅमेरा तिचे हाव-भाव कैद करत होता. याच सामन्यात एकाक्षणी कॅमेरा काव्याच्या चेहऱ्यावर जाताच तिला राग आला. पंजाबची इनिंग सुरु होती. शिखर धवनची फटकेबाजी सुरु होती. सनरायजर्स हैदराबादच्या अडचणी तो वाढवत होता. याच दरम्यान कॅमेरा काव्यावर आला. ती आधीच टेन्शनमध्ये होती. जेव्हा तिने मोठ्या स्क्रीनवर स्वत:ला पाहिलं, तेव्हा कॅमेऱ्याकडे पाहून हट यार म्हटलं.
View this post on Instagram
कॅमेऱ्याचा फोकस तिच्यावर
काव्या जेव्हा मैदानात असते, तेव्हा कॅमेऱ्याचा फोकस तिच्यावर असतो. तिला क्रिकेट खूप आवडतं. मैदानातील तिच्या प्रेझेन्सवरुन हे लक्षात येतं. आयपीएलच्या लिलावात ती टीमचे कोच आणि फ्रेंचायजीसोबत बसून खेळाडूंवर बोली लावते. मॅचचा निकाल काय?
मॅच बद्दल बोलायच झाल्यास, पंजाबकडून फक्त शिखर धवनची बॅट चालली. तो नाबाद 99 धावांची इनिंग खेळला. त्याने 66 चेंडूत 12 चौकार आणि 5 षटकार लगावले. त्याच्याशिवाय सॅम करनने दोन आकडी धावसंख्या गाठली. करनने 15 चेंडूत 22 धावा केल्या. हैदराबादने 17.1 ओव्हर्समध्ये दोन विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठलं.