World Cup 2023 Final | सुरक्षेत मोठी चूक, हजारो पोलीस असूनही मैदानात घुसला, विराटच्या खांद्यावर ठेवला हात
World Cup 2023 Final | नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कप फायनलचा सामना सुरु असताना सुरक्षेत मोठी चूक दिसून आलीय. खरंतर हजारो पोलीस सुरक्षेसाठी मैदान परिसरात तैनात आहेत. ही खूप गंभीर बाब आहे.
अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलचा सामना सुरु आहे. या मॅच दरम्यान थोड्यावेळासाठी अडथळा निर्माण झाला होता. रविवारी मॅच सुरु असताना अचानक एका व्यक्तीने मैदानात घुसखोरी केली. सामन्याच्या 14 व्या ओव्हर दरम्यान हा प्रकार घडला. घुसखोरी करणाऱ्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता. त्यावर एक संदेश लिहिलेला होता. घुसखोरी करणाऱ्याने व्हाइट टी-शर्ट घातला होता. लाल रंगाची हाफ पॅन्ट परिधान केली होती. त्याने विराट कोहलीच्या खांद्यावर सुद्धा हात ठेवला. यावेळी विराटची साथ द्यायला समोरच्या टोकाला केएल राहुल होता.
महत्त्वाच म्हणजे ही सुरक्षा बंदोबस्तातली मोठी चूक आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी फायनलचा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर येणार आहे. इतका प्रचंड पोलीस बंदोबस्त अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आहे. काही हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात आहेत, असं असातानाही मैदानात ही घुसखोरी कशी झाली. हा मोठा प्रश्न आहे. स्टेडियममध्ये बंदोबस्ताला असलेल्या सुरक्षा जवानांनी लगेच घुसखोरी करणाऱ्याला ताब्यात घेतलं. रोहित शर्मा (47) आणि श्रेयस अय्यर (4) धावांवर आऊट झालेला. दोघांची पार्टनरशिप सुरु होती. त्यावेळी अचानक घुसखोरीची घटना घडली.
#WATCH | Gujarat: The man who entered the field during the India vs Australia Final match, brought to the Chandkheda Police Station in Ahmedabad pic.twitter.com/pm9AMyhsSi
— ANI (@ANI) November 19, 2023
कशासाठी हा मुलगा मैदानात घुसला?
मैदानात घुसखोरी करणाऱ्या मुलाने पॅलेस्टाइनच मास्क लावल होतं. त्याच्या टी-शर्टवर संदेश लिहिलेला होता. सध्या इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. त्या संदर्भात जगाच लक्ष वेधून घेण्यासाठीच या मुलाने असा घुसखोरीचा प्रयत्न केला. जगातील महत्त्वाचे सामने, इवेंटच्यावेळी अशा घटना घडतात.