EaseMyTrip WCL सीझन 2 स्पर्धेसाठी इंडिया चॅम्पियन्स सज्ज, युवराज सिंगच्या खांद्यावर पुन्हा धुरा
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या दुसर्या पर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पहिल्या पर्वात युवराज सिंगच्या नेतृत्वात जेतेपद मिळवलं होतं. सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, इरफान आणि युसूफ पठाण यांनी ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

सिक्सर किंग युवराज सिंगने जुलैमध्ये युनायटेड किंग्डममध्ये होणाऱ्या EaseMyTrip वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या दुसऱ्या पर्वात पुन्हा एकदा इंडिया चॅम्पियन्स संघाचं नेतृत्व करणार आहे. आपला सहभाग निश्चित केला आहे. या स्पर्धेतील पहिलं जेतेपद मिळवण्याचा मान इंडिया चॅम्पियन्स संघाला मिळाला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीचा सामना झाला होता. हा सामना भारताने पाच गडी राखून जिंकला होता. या सामन्यात अंबाती रायुडूने अर्धशतक झळकावत विजय मिळवून दिला होता. यंदाच्या पर्वात युवराजसोबत सलामीवीर शिखर धवन संघात सहभागी होणार आहे. मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्पर्धेत पदार्पण करणार आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डद्वारे समर्थित असलेल्या EaseMyTrip वर्ल्ड चॅम्पियन्स लीग टी20 स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात भारताचे पुन्हा नेतृत्व करण्याऱ्या युवराज सिंगने सांगितलं की, “मी EaseMyTrip वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये पुन्हा एकदा आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहे. माझ्या सहकाऱ्यांसह स्पर्धेच्या पहिल्या पर्वातील विजयाच्या आठवणी नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहेत.” मागच्या पर्वात युवराज सिंग, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, इरफान आणि युसूफ पठाण आणि भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी जबरदस्त कामगिरी केली होती.
EaseMyTrip वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सचे संस्थापक हर्षित तोमर यांनी स्पर्धेबाबत आपलं मत मांडताना सांगितलं की, “मी नेहमीच या स्पर्धेकडे क्रिकेटला त्याच्या दिग्गज क्रिकेटपटूंद्वारे भविष्य घडवण्याचा मार्ग म्हणून पाहिले आहे. क्रिकेटच्या सुपरस्टार्सना पुन्हा खेळताना पाहणे ही एक आत्मिक समाधानाची बाब आहे. दिग्गज क्रिकेटपटूंसोबत आमची भावनिक नाळ जुळलेली आहे. आमच्या क्षमतेनुसार आणि त्यांची काळजी घेत सर्वोत्तम आतिथ्य करणे हे नेहमीच आमचे ध्येय राहिले आहे.”
EaseMyTrip चे अध्यक्ष आणि संस्थापक आणि EaseMyTrip वर्ल्ड चॅम्पियन्स लीगचे मुख्य संरक्षक निशांत पिट्टी यांनी सांगितलं की, “वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स ही केवळ एक स्पर्धा नाही. ही खेळातील महान खेळाडू आणि त्यांच्या शाश्वत वारशाचा उत्सव आहे. आम्हाला या उल्लेखनीय प्रवासाचा भाग होण्यास आनंद होत आहे. दिग्गज क्रिकेटपटूंना एकत्र आणतो, प्रतिष्ठित स्पर्धांना पुनरुज्जीवित करतो आणि चाहत्यांना पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेटची अनुभूती देतो.” सुमंत बहल, सलमान अहमद आणि जसपाल बहरा यांच्याकडे इंडिया चॅम्पियन्स संघाचा मालकी हक्क आहे. इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेतील अव्वल आंतरराष्ट्रीय स्टार्सविरुद्ध लढाई करण्यासाठी सज्ज आहेत.
“टीम इंडिया चॅम्पियन्सचा मालक होण्याचा आणि दिग्गज खेळाडूंसोबत काम करण्याचा आनंद आहे. मागच्या पर्वात पाकिस्तानला हरवून जेतेपद मिळवलं होतं. आमचा प्रवास अजूनही स्वप्नवत वाटतो, आम्ही सीझन 2 बद्दल खूप उत्साहित आहोत. या वर्षी एका मजबूत आणि चांगल्या संघाच्या मदतीने इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहोत” असे टीम इंडिया चॅम्पियन्सचे सह-मालक सुमंत बहल यांनी सांगितलं.
EaseMyTrip वर्ल्ड चॅम्पियन्स लीगकडे एक गेम-चेंजिंग टूर्नामेंट म्हणून पाहिलं जात आहे. या माध्यमातून निवृत्त क्रिकेट दिग्गजांच्या स्पर्धात्मक भावनेला पुन्हा जागृत करते आणि त्यांना पुन्हा जागतिक प्रकाशझोतात आणण्याचा मानस आहे.