IPL Final 2023 : स्पंजमुळे लाज निघाली, ECB पेक्षा 728 टक्क्यांनी श्रीमंत BCCI पीचसाठी होव्हर कव्हर्स कधी वापरणार?
IPL Final 2023 : इंग्लंड क्रिकेट बोर्डापेक्षा BCCI 728 टक्क्यांनी श्रीमंत आहे. हे होव्हर कव्हर्स काय असतात? स्पंज वापरताना या सगळ्याच लाइव्ह प्रक्षेपण सुरु होतं. सोशल मीडियावर याबद्दल बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतय.
अहमदाबाद : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या BCCI ला सोमवारी IPL 2023 च्या फायनलवेळी एका लाजिरवाण्या प्रसंगाला सामोर जावं लागलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच झाली. जगातील हे सर्वात मोठ क्रिकेट स्टेडियम आहे. सामन्यादरम्यान पाऊस कोसळल्यामुळे गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मध्येच थांबवावा लागला. पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी आणि मैदान सुकवण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमच मॅनेजमेंट संघर्ष करताना दिसलं.
स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफने मैदान सुकवण्यासाठी देशी पद्धतीचा जुगाड केला. ग्राऊंड स्टाफच्या टीमने खेळपट्टीवरुन पाणी काढण्यासाठी, पीच सुकवण्यासाठी मोठ्या स्पंजचा वापर केला. या सगळ्याच लाइव्ह प्रक्षेपण सुरु होतं. सोशल मीडियावर याबद्दल बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतय.
मैदान सुकवण्यासाठी देसी जुगाड
मैदानातून पाणी काढून खेळ सुरु करण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व ग्राऊंड स्टाफने केलं. चिखल झालेल्या पृष्ठभागावरुन पाणी काढण्यासाठी त्यांनी मोठे स्पंज वापरले. त्यानंतर त्यावर माती टाकली. जेणेकरुन प्लेयर्स त्यावरुन आरामात पळू शकतात. अंपायर्स कंडीशनमुळे नाराज होते. पावसानंतर खेळ चालू व्हायला तासाभराचा विलंब लागला. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर खेळपट्टी तयार झाली. पण तो पर्यंत उशिर झालेला, त्यामुळे 5 ओव्हर्सचा खेळ कमी झाला. 20 ऐवजी सामना 15 ओव्हर्सचा झाला.
#IPL2023Finals #IPLFinal2023 #MSDhoni #CSKvsGT #GTvCSK#CSKvGT Pic 1 : ECB covering their ground with hover covers, covers a large portion and minimal manpower required to drag it.
Pic 2 : BCCI using sponges to soak water
Please Note that BCCI is 728% richer than the ECB pic.twitter.com/KCyp28MU8O
— ??? (@superking1816) May 29, 2023
होव्हर कव्हर्स बीसीसीआय कधी वापरणार?
इंग्लंड क्रिकेट बोर्ड पावसापासून खेळपट्टीचा बचाव करण्यासाठी होव्हर कव्हरचा वापर करते. होव्हर कव्हर्सनी मैदानावरचा मोठा भाग झाकता येतो, तसच हे खेचण्यासाठी कमी मनुष्यबळ लागतं. दुसऱ्याबाजूला BCCI हे ECB पेक्षा 728 टक्क्यांनी श्रीमंत आहे. मग मनात प्रश्न येतो, बीसीसीआय आपल्या मैदानांसाठी अशा टेक्नोलॉजीचा वापर कधी करणार? वर्ल्ड कपचा महत्वाचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर
नरेंद्र मोदी स्टेडियम अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेल स्टेडियम आहे, असं बीसीसीआयच म्हणणं आहे. 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांना सामावून घेण्याची या स्टेडियमची क्षमता आहे. वर्ल्ड कप 2023 मध्ये इथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होऊ शकतो. त्यावेळी अशी परिस्थिती ओढवल्यास काय होईल?