ENG vs AUS 2nd Test | ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत, तिसऱ्या दिवसाचा ‘गेम ओव्हर’

ngland VS Australia 2nd Test | लॉर्ड्समध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ऑलआऊट केल्यानंतर मोठी आघाडी घेतली आहे.

ENG vs AUS 2nd Test | ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत, तिसऱ्या दिवसाचा 'गेम ओव्हर'
पहिल्या तीन कसोटीत त्याने 6 डावात 141 धावा केल्या आहेत. बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 78 धावांवर बाद झाल्यावर झाला होता. त्यावरून मोठा वाद झाला होता.
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 11:01 PM

लॉर्ड्स | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाकडे आता 221 धावांची मोठी आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 45.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 130 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर याने 25 तर मार्नस लाबुशेन याने 30 धावा केल्या. तर उस्मान ख्वाजा 58 आणि स्टीव्हन स्मिथ 6 धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलिया या सामन्यात मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला चौथ्या दिवशी इंग्लंडला किती धावांचं आव्हान देणार, याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असणार आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला

हे सुद्धा वाचा

इंग्लंडने तिसऱ्या दिवशी 4 बाद 278 धावांपासून सुरुवात केली. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 325 धावांवर आटोपला. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या. अशाप्रकारे पहिल्या डावात 91 धावांची आघाडी घेतली.

इंग्लंडचा पहिला डाव

इंग्लंडने पहिल्या डावात 76.2 ओव्हरमध्ये 325 धावा केल्या. डकेट याचं अवघ्या 2 धावांनी शतक हुकलं. इंग्लंडकडून बेन डकेट याने सर्वाधिक 98 धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रूक याने 50 धावा केल्या. झॅक क्रॉली 48 रन्स करुन आऊट झाला. ओली पोप याने 42 धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी या व्यतिरिक्त इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करु दिली नाही.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनी प्रत्येकी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर पॅट कमिन्स, नेथन लायन आणि कॅमरुन ग्रीन या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग

त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ याने सर्वाधिक 110 धावांची खेळी केली. ट्रेव्हिस हेड याने 77 रन्स केल्या. डेव्हिड वॉर्नर याने 66 रन्स केल्या. या तिघांव्यतिरिक्त इतरांना विशेष काही करता आलं नाही.

इंग्लंडकडून रॉबिन्सन आणि जोश टाँग या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर जो रुट याने 2 फलंदाजांना मैदनाबाहेरचा रस्ता दाखवला. तर स्टुअर्ट ब्रॉर्ड आणि जेम्स एंडरसन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ओली पॉप, जो रुट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), स्टुअर्ट बॉर्ड, ऑली रॉबिन्सन, जॉश टंग आणि जेम्स एंडरसन.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.