Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket: टीम कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर रवाना, पहिली मॅच केव्हा?

Test Cricket: टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत लोळवल्यानंतर श्रीलंका इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघात एकूण 3 सामने होणार आहेत.

Test Cricket: टीम कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर रवाना, पहिली मॅच केव्हा?
india sri lanka test cricket
Follow us
| Updated on: Aug 11, 2024 | 9:46 PM

श्रीलंकेने टीम इंडियाला द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत 2-0 अशा फरकाने पराभूत केलं. श्रीलंकेने यासह इतिहास रचला. श्रीलंकेला टीम इंडिया विरुद्ध तब्बल 27 वर्षांनी द्विपक्षीय मालिकेत विजय मिळवण्यात यश आलं. त्यानंतर आता श्रीलंकेसमोर इंग्लंडचं आव्हान आहे. श्रीलंका इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. श्रीलंका टीम या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला रवाना झाली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. धनंजया डी सिल्वा हा श्रीलंकेचं तर बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे.

इंग्लंडसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा

इंग्लंड आणि श्रीलंकेसाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणार आहे. इंग्लंडला तर आता एकही पराभव महागात पडू शकतो. इंग्लंड डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या तिसऱ्या मोसमात सहाव्या स्थानी आहे. इंग्लंड क्रमवारीत सहाव्या स्थानी आहे. तर श्रीलंका 50 टक्क्यांसह चौथ्या स्थानी विराजमान आहे. त्यामुळे एक पराभव इंग्लंडच्या अंतिम फेरीत पोहचण्याचा स्वप्नाला छेद देणारा ठरु शकतो. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेने या मालिकेतील तिन्ही सामने गमावल्यास त्यांच्याही मोहिमेला सुरुंग लागेल.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 21-25 ऑगस्ट, मँचेस्टर.

दुसरा सामना, 29 ऑगस्ट- 2 सप्टेंबर, लॉर्ड्स.

तिसरा सामना, 6-10 सप्टेंबर, केनिंग्टन ओव्हल.

श्रीलंका इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज

कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम: बेन स्टोक्स (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, ओली पोप (उपकर्णधार), जो रूट, जॉर्डन कॉक्स, हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मार्क वुड, शोएब बशीर, ओली स्टोन आणि मॅट पॉट्स.

टेस्ट सीरिजसाठी श्रीलंका क्रिकेट  टीम : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पाथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चांदिमल, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो, कसुन रजिथा, लाहिरू कुमारा, निसाला थारका, प्रभात जयसूर्या, रमेश मेंडिस, जेफ्री वेंडरसे आणि मिलन रथनायके.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.