इंग्लंडचं व्हाईट वॉशचं स्वप्न श्रीलंकेच्या पाथुम निसंकाने हाणून पाडलं, शतकी खेळीसह एकटा पडला भारी

श्रीलंकेने मालिका गमावली असली तरी तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला तोडीस तोड उत्तर दिलं आहे. तिसरा कसोटी सामना इंग्लंडने 8 गडी राखून जिंकला. इंग्लंडने 219 धावांचं आव्हान ठेवलं होते. यात पाथुम निसंकाने शतकी खेळी करत इंग्लंडच्या व्हाईट वॉश स्वप्नावर पाणी टाकलं.

इंग्लंडचं व्हाईट वॉशचं स्वप्न श्रीलंकेच्या पाथुम निसंकाने हाणून पाडलं, शतकी खेळीसह एकटा पडला भारी
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 5:42 PM

श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडने 2-1 ने जिंकली. मालिका इंग्लंडच्या खिशात गेली असली तरी तिसरा कसोटी सामना श्रीलंकेने जिंकला हे विशेष..कारण पहिल्या दोन कसोटी सामन्यातील इंग्लंडची कामगिरी पाहिली तर व्हाईट वॉश मिळेल असंच वाटत होतं. पण तिसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने कमबॅक केलं. तसेच इंग्लंडला तिसऱ्या सामन्यात पराभूत करत मालिका 2-1 अशी गमावली. तिसऱ्या कसोटी सामन्यात पाथुम निसंका इंग्लंडवर भारी पडला. पहिल्या डावात त्याने 51 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 64 धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात शतकी खेळी करून इंग्लंडला पराभवाची चव चाखायला दिली. पाथुम निसंकाने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं आणि धावांची गतीही कायम राखली. संघाच्या 39 धावा असताना दिमुथ करुणारत्ने 8 धावा करून तंबूत परतला. तेव्हा श्रीलंकेचा काही खरं नाही असंच वाटत होतं. पण त्याच्या उलट झालं.पाथुम निसंकाला पहिल्यांदा साथ दिली ती कुसल मेंडीसने आणि त्याच्यासोबत 67 धावांची भागीदारी केली. कुसल मेंडिस बाद झाल्यानंतर अनुभवी अँजेलो मॅथ्यूज मैदानात उतरला आणि दोघांनी विजयी भागीदारी केली.

पाथुम निसंकाने 107 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. पाथुमने 94.39 च्या स्ट्राईक रेटने 101 धावा केल्या. त्यानंतरही त्याने आक्रमक खेळी पुढे सुरुच ठेवली. संघाला 40 धावांची आवश्यकता होती. तेव्हा अँजेलो मॅथ्यूज 19 धावांवर होता. विजय जवळ दिसत असल्याने दोन्ही खेळाडूंनी प्रहार सुरुच ठेवला. पाथुमने आणखी दोन चौकार आणि दोन षटकार त्यात मारले आणि नाबाद 127 धावा केल्या. तर अँजेलो मॅथ्यूजने 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 32 धावा केल्या.

दुसऱ्या डावात इंग्लंडकडे 92 धावांची आघाडी असताना श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. लहिरू कुमाराने 4 विकेट घेतल्या. तर विश्व फर्नांडोने 3, असिथा फर्नांडोने 2 आणि मिलन रत्ननायकेने 1 गडी बाद केला. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डावा फक्त 156 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जेमी स्मिथने 67 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज तग धरू शकला नाही. इंग्लंडने दिलेलं 219 धावांचं लक्ष्य श्रीलंकेने दोन गडी गमवून पूर्ण केलं.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.