ENG vs SA : लॉर्ड्सवर इंग्लंडचा पराभव, आफ्रिकेची कसोटी मालिकेत 1-0 आघाडी, इंग्लंडचा डाव 149 धावांत गुंडाळला

England vs South Africa : पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव केला होता. लॉर्ड्सवरील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा 12 धावांनी पराभव झाला. याविषयी तुम्ही अधिक जाणून घ्या...

ENG vs SA : लॉर्ड्सवर इंग्लंडचा पराभव, आफ्रिकेची कसोटी मालिकेत 1-0 आघाडी, इंग्लंडचा डाव 149 धावांत गुंडाळला
इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेची कसोटी मालिकेत 1-0 आघाडीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 8:21 AM

नवी दिल्ली :  लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघानं इंग्लंडचा (ENG vs SA) 12 धावांनी पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने (South Africa) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 161 धावांची आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा (ENG) डाव अवघ्या 149 धावांत गुंडाळला आणि तिसऱ्या दिवशीच सामना जिंकला.नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात इंग्लंडला अवघ्या 165 धावांत गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 326 धावा केल्या. शुक्रवारी आफ्रिकेने 161 धावांची आघाडी घेतली होती. त्याचवेळी दुसऱ्या डावातही आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज गडगडले आणि संघाला केवळ 149 धावा करता आल्या. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल अवघ्या 6 सत्रात लागला. हा कसोटी सामना फक्त तीन दिवस चालला.

3 बळी घेत बॅकफूटवर आणले

दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांच्याकडे आफ्रिकन गोलंदाजीचे उत्तर नव्हते. कर्णधार डीन एल्गरने केशव महाराजकडे चेंडू टाकला जो लंचपूर्वी झॅक क्रोली (13) आणि ऑली पोप (5) यांना पॅव्हेलियनमध्ये परतला. उपाहारानंतर लुंगी एन्गिडीने जो रूटची महत्त्वपूर्ण विकेट घेतली, तर नोरखेयाने जॉनी बेअरस्टो, अ‍ॅलेक्स लीस आणि बेन फोक्सच्या रूपाने तीन बळी घेत इंग्लंडला बॅकफूटवर आणले. शेवटी रबाडा आणि जॅन्सेन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत इंग्लंडचा डाव 149 धावांवर संपुष्टात आणला.

दक्षिण आफ्रिकेचा लॉर्ड्सवरील पाचवा विजय

एकाही इंग्लिश फलंदाजाला 50 धावांचा टप्पा गाठता आला नाही. इंग्लंडकडून अ‍ॅलेक्स लीस आणि स्टुअर्ट ब्रॉडने 35 धावा केल्या. प्रोटीजसाठी रबाडाने दोन्ही डावात सात बळी घेतले. तर नोरखेयाने सहा आणि जॅन्सेनने चार बळी घेतले. क्रिकेटमध्ये पुन:प्रवेश केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा लॉर्ड्सवरील हा पाचवा विजय आहे.

हे सुद्धा वाचा

सरेल एरवी (73) आणि मार्को यान्सेन (48) यांच्या जबाबदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 161 धावांची आघाडी घेतली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, दक्षिण आफ्रिकेने त्यांचा डाव 189/7 पर्यंत वाढवला आणि शेवटच्या तीन विकेटसाठी 37 धावा जोडल्या. जॅन्सनचे पहिले कसोटी अर्धशतक हुकले आणि तो 79 चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 48 धावा काढून बाद झाला.

एनरिक नॉर्खियाने नाबाद 28 धावांची खेळी केली तर स्टुअर्ट ब्रॉड आणि मॅथ्यू पॉट्स यांनी शेवटच्या तीन विकेट घेत प्रोटीजचा डाव 326 धावांत संपुष्टात आणला. दक्षिण आफ्रिकेसाठी आर्वीने 146 चेंडूत सर्वाधिक 73 धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि ब्रॉडने प्रत्येकी तीन तर पॉट्सने दोन गडी बाद केले.जॅक लीच आणि जेम्स अँडरसनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.