Virat kohli बरोबर करायचं होतं लग्न, आता ती ‘या’ महिलेसोबत थाटणार संसार

बॅट्समनने टि्वटरवरुन जाहीरपणे टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली बरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला प्रपोज केलं होतं

Virat kohli बरोबर करायचं होतं लग्न, आता ती 'या' महिलेसोबत थाटणार संसार
danny wyatt engagement with girlfriend georgie hodgeImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 8:23 AM

लंडन : येत्या शनिवारपासून वुमेन्स प्रीमियर लीगची सुरुवात होत आहे. भारतासह जगभरातील महिला क्रिकेटपटू WPL मध्ये आपला सर्वोत्तम खेळ दाखवतील. या टुर्नामेंटमध्ये इंग्लंडची अनुभवी फलंदाज डॅनी वायट खेळताना दिसणार नाही. कारण तिला कुठल्याही फ्रेंचायजीने विकत घेतलेलं नाही. त्यामुळे डॅनी आणि तिचे फॅन्स निराश होते. पण आता इंग्लिश बॅट्समनने एका बातमीने आपल्या चाहत्यांची निराशा दूर केली आहे.

किस करतानाचा एक फोटो पोस्ट

डॅनी वायटने गुरुवारी 2 मार्चला सोशल मीडिया अकाऊंटवर एका फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करताना तिने आनंदाची बातमी दिली. पण त्याचबरोबर अनेकांना धक्का सुद्धा दिला. डॅनी वायटने तिची गर्लफ्रेंड जॉर्जी हॉजसोबत साखरपुडा केलाय. डॅनीने जॉर्जीला किस करतानाचा एक फोटो पोस्ट केलाय. यात साखरपुड्याची अंगठी तिच्या हातामध्ये दिसतेय.

जॉर्जी काय करते?

इंग्लिशन बॅट्समन डॅनी वायट आणि जॉर्जी हॉज बऱ्याचकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. जॉर्जी पेशाने फुटबॉल एजंट आहे. इंग्लंडच्या प्रसिद्ध फुटबॉल क्लबच्या महिला टीम्ससाठी कॉन्ट्रॅक्ट डील्सवर ती काम करते.

वायट आणि हॉज खूप वर्षापासून रिलेशनशिपमध्ये

वायट आणि हॉजच नातं खूप जुनं आहे. दोघी क्रिकेट मॅचपासून फुटबॉल मॅच आणि अन्य प्रसंगी एकत्र दिसतात. इन्स्टाग्रामवर दोघी परस्परांवर प्रेम व्यक्त करताना सुंदर फोटो पोस्ट करत असतात. अर्जुन बरोबर चांगली मैत्री

डॅनी वायट काही वर्षांपूर्वी एका वेगळ्या कारणांमुळे भारतात चर्चेत आली होती. 10 वर्षापूर्वी या इंग्लिश बॅट्समनने टि्वटरवरुन जाहीरपणे टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली बरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला प्रपोज केलं होतं. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर बरोबर सुद्धा डॅनीची चांगली मैत्री आहे. अर्जुन आणि डॅनीचे इंग्लंडमध्ये एकत्र फिरतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.