IND vs ENG 1st Test Toss | इंग्लंडने टॉस जिंकला, टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?
India vs England 1st Toss Update | इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाने टॉस गमावला आहे. टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण कोण आहे? पाहा.
हैदराबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता टॉस झाला. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने टॉस जिंकला. स्टोक्सने टीम इंडिया विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडियात कुलदीप यादव याला बाहेर ठेवून अक्षर पटेल याला संधी देण्यात आली आहे.
इंग्लंड पहिल्या कसोटीत 3 स्पिनर्स आणि 1 वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरली आहे. मार्क वूड हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. आता इंग्लंडचा हा निर्णय किती योग्य की चुकीचा हे स्पष्ट होईलच. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियात विराट कोहली याच्या जागी श्रेयस अय्यर याला संधी देण्यात आली आहे. तर विकेटकीपर म्हणून श्रीकर भरत याला संधी देण्यात आली आहे.
तर टीम इंडिया 3 स्पिनर्स आणि 2 वेगवान गोलंदाजांसह इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियात अक्षर पटेल, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा असे 3 स्पिनर्स आहेत. तर यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह आणि लोकल बॉय मोहम्मद सिराज हे दोघे वेगवान गोलंदाज आहेत.
केएल राहुल याचं अर्धशतक
दरम्यान टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याचा इंग्लंड विरुद्धचा पहिला सामना हा त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 50 वा सामना आहे. केएल या संपूर्ण मालिकेत फलंदाज म्हणून खेळणार आहे. त्याची विकेटकीपर या जबाबदारीतून मुक्तता करण्यात आली आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंड कसोटी मालिकेसाठी सज्ज
Stage set for an action-packed 5-match Test series 🔥
It’s ACTION time in Hyderabad 🤝
Follow the match ▶️ https://t.co/HGTxXf8b1E#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Hj8FfRulXq
— BCCI (@BCCI) January 25, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.