Sara Tendulkar Shubman Gill | शुबमन गिल याच्या शतकानंतर सारा इम्प्रेस? त्या फोटोमुळे चर्चा
शुबमन गिल याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खणखणीत शतक ठोकलं. या शतकानंतर सारा तेंडुलकर हीची शुबमन गिल याच्यासाठी पोस्ट केलेली इंस्टा स्टोरी व्हायरल झाली आहे.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील 62 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने हैदराबादवर 34 धावांनी विजय मिळवला. शुबमन गिल हा गुजरातच्या विजयाचा हिरो ठरला. शुबमनने गुजरात अडचणीत असताना खणखणीत शतक ठोकलं. शुबमनने 58 बॉलमध्ये 13 फोर आणि 1 सिक्स ठोकत 101 धावा केल्या. शुबमनचं हे आयपीएलमधील पहिलंवहिलं शतक ठोकलं. तसेच शुबमन हा या 16 व्या मोसमात हॅरी ब्रूक, वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, प्रभासिमरन सिंह यांच्यानंतर सहावा फलंदाज ठरला.
शुबमन याच्या या शतकानंतर सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शुबमन आणि सारा या दोघांचं नाव अनेकदा जोडलं गेलं आहे. या दोघांमध्ये काही शिजत असल्याचीही चर्चा आहे. आता शुबमनच्या सेंच्युरीनंतर सारा तेंडुलकर हीची इंस्टा स्टोरी व्हायरल झाली आहे. या स्टोरीमध्ये हार्ट असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सारा आणि शुबमन यांच्या दोघांमध्ये कथित रिलेशनला पुन्हा एकदा हवा मिळाली.
तर दुसऱ्या बाजूला साराचा भाऊ आणि अर्जून तेंडुलकर याला कु्त्रा चावल्याचं समोर आलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी सारावर टीका केली. भावाला कुत्रा चावल्याचं काही वाटत नाही. पण शुबमनच्या शतकानंतर स्टोरी पोस्ट केली, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. मात्र या स्टोरीमागचं सत्य काही वेगळंच आहे.
शुबमन याच्या शतकानंतर या स्टोरीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. अनेकांनी तर सारा आणि शुबमन हे दोघे रिलेशनमध्ये असल्याचंही जाहीर करुन टाकलं. मात्र या स्टोरीचं सत्य काही वेगळं आहे. साराने शुबमनबाबत अशी कोणतीच पोस्ट केलेली नाही. हा नेटकऱ्यांनी केलेला खोडसाळपणा आहे.
शुबमनच्या शतकानंतर साराची व्हायरल सोशल मीडिया पोस्ट
Instagram story of sara Tendulkar after the century pic.twitter.com/GAlscFrVWA
— Mufaddal Vohra (@Mufadda_Vohraa) May 15, 2023
काही नेटकऱ्यांनी साराच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या टॅम्पलेटला जोडून त्यात शुबमनचा फोटो जोडलाय. सोबत काही हार्ट इमोजी जोडून साराच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे साराने अशी कोणतीही पोस्ट केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी आणि टी नटराजन.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, दासून शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी आणि नूर अहमद.