GT vs CSK IPL 2023 Final : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये महिलेने मारली पोलिसाच्या कानाखाली, Video Viral

GT vs CSK IPL 2023 Final : फायनल मॅचच्यावेळी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. कॅमेऱ्यामध्ये एक अशोभनीय घटना कैद झाली. कालच्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरवलं.

GT vs CSK IPL 2023 Final : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये महिलेने मारली पोलिसाच्या कानाखाली, Video Viral
GT vs CSK IPL 2023 Final Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 11:03 AM

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ स्टेडियम आहे. काल या मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन टीम्समध्ये IPL 2023 च्या सीजनची फायनल मॅच होती. दोन्ही टीम्सनी संपूर्ण सीजनमध्ये जबरदस्त कामगिरी करुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. काल IPL 2023 च्या सीजनचा फायनल सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम खच्चून भरलं होतं. यावेळी या स्टेडियममध्ये एक अप्रिय घटना घडली.

कॅमेऱ्यामध्ये एक अशोभनीय घटना कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. कालच्या दिवसात क्रिकेटपेक्षा पावसाचा खेळ जास्त होता.

काल पावसाचा खेळ

कालच्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरवलं. संध्याकाळी टॉसच्या काहीवेळ आधी सुरु झालेला पाऊस रात्रीपर्यंत थांबलचा नाही. त्यामुळे आज रिझर्व्ह डे च्या दिवशी आयपीएल 2023 ची फायनल होणार आहे. कालच्याच तिकीटावर प्रेक्षक आज स्टेडियममध्ये येऊन मॅच पाहू शकतात.

पोलिसाचा अपमान

रविवारी स्टेडियममध्ये क्रिकेटरसिक फायनल मॅचच्या प्रतिक्षेत असताना एक अप्रिय घटना घडली. स्टेडियममध्ये पोलीस हे आपल्या सुरक्षेसाठी असतात. पण एका महिला चाहतीला याचा विसर पडला. तिने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाचा अपमान केला.

पोलिसावर हात उचलला

या वादामागे नेमकं काय कारण आहे? ते अजून स्पष्ट झालेलं नाहीय. या महिलेने सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसावर हात उचलला. त्याच्या कानाखाली मारली. महिला त्याला ढकलत होती. सर्वांसमक्ष हे भांडण सुरु होतं. तो पोलीस तिथून निघून गेला.

या महिलेकडे असं वागण्याचा अधिकार होता का?

हा व्हिडिओ व्हायरल होताच, टि्वटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या महिलेवर कठोर कारवाई करावी, असं काही युजर्सनी म्हटलं आहे. या महिलेकडे असं वागण्याचा अधिकार होता का? असा प्रश्न काही युजर्सनी विचारलाय.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.