FIFA World Cup 2022: फुटबॉलसमोर क्रिकेट फकीरांचा खेळ, बक्षिसाचा आकडा वाचूनच डोळे विस्फारतील
FIFA फुटबॉल वर्ल्ड कप 2022 मध्ये प्राइज मनीपोटी मिळणाऱ्या बक्षिसाचा आकडा ऐकून डोळे पांढरे होतील.
नवी दिल्ली: फुटबॉल वर्ल्ड कप 2022 स्पर्धेला 20 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. कतारमध्ये यंदाचा फुटबॉल वर्ल्ड कप होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू आणि टीम्सवर पैशांचा पाऊस पडणार आहे. क्रिकेटमधला पैसा पाहून क्रिकेट आपल्या देशातला श्रीमंत खेळ आहे. पण फुटबॉलसमोर क्रिकेटची अवस्था फकीरासारखी आहे.
फुटबॉलसमोर क्रिकेट गरीब खेळ ठरतो. तुम्हाला ऐकून थोड आश्चर्य वाटेल, पण FIFA World Cup 2022 मध्ये सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या टीमला वर्ल्ड कप चॅम्पियन इंग्लंडपेक्षा 60 कोटी रुपये जास्त मिळणार आहेत. त्यावरुन फुटबॉलमध्ये किती पैसा आहे, ते लक्षात येतं.
फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला किती कोटी मिळणार?
फुटबॉल वर्ल्ड कप 2022 मधील एकूण प्राइज मनीचा आकडा ऐकून डोळे पांढरे होतील. बक्षिसापोटी 3568 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये ही रक्कम फक्त 45.4 कोटी रुपये होती. फुटबॉल वर्ल्ड कप 2022 जिंकणाऱ्या टीमला 344 कोटी रुपये मिळणार आहेत. टी 20 वर्ल्ड कप विजेत्या टीमला म्हणजेच इंग्लंडला फक्त 13 कोटी रुपये मिळाले होते.
उपविजेत्या टीमला किती कोटी मिळणार?
फुटबॉल वर्ल्ड कप 2022 मधील उपविजेत्या टीमला 245 कोटी रुपये इनामी रक्कम मिळणार आहे. टी 20 वर्ल्ड कपमधील उपविजेती टीम पाकिस्तानला 6.5 कोटी रुपये मिळाले.
सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या टीमला 219 कोटी
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या नंबरवर राहणाऱ्या टीमला 219 कोटी रुपये आणि चौथ्या नंबरवरील टीमला 202 कोटी रुपये मिळतील. टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या टीमला 3.25 कोटी रुपये मिळाले होते.
पहिल्या राऊंडमधून बाहेर होणाऱ्य़ा टीमवरही पैशांचा पाऊस
फीफा वर्ल्ड कपमधून पहिल्या राऊंडमधून बाहेर होणाऱ्या टीमना 72 कोटी रुपये मिळणार आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये हीच रक्कम 32.5 लाख रुपये होती.