IPL 2023 मध्ये खेळणाऱ्या मुंबईच्या एक मोठ्या क्रिकेटपटूसाठी वाईट बातमी

IPL 2023 सुरु असताना मुंबईचा हा क्रिकेटपटू अडचणीच सापडला आहे. त्याच्या अडचणीच आणखी भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

IPL 2023 मध्ये खेळणाऱ्या मुंबईच्या एक मोठ्या क्रिकेटपटूसाठी वाईट बातमी
क्रिकेट खेळताना क्षुल्लक वादातून तरुणाला संपवले
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 8:14 AM

IPL 2023 News : आयपीएल टुर्नामेंट सुरु असताना मुंबईच्या एका प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याच्यासाठी हा एक झटका आहे. काही महिन्यांपूर्वी हा क्रिकेटर वादात सापडला होता. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या क्रिकेटरचा मुंबईतील एका हॉटेलबाहेर वाद झाला होता. आता ऐन आयपीएल टुर्नामेंट दरम्यान या क्रिकेटरच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलय.

मुंबईचा हा प्रसिद्ध क्रिकेटपटू टीम इंडियाकडून सुद्धा खेळला आहे. भारतीय टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याचा संघर्ष सुरु आहे. चालू आयपीएलमध्येही त्याचा फॉर्म फार चांगला नाहीय. आता या प्रकरणामुळे त्याचा त्रास आणखी वाढणार आहे.

काय घडलेलं?

मुंबईच्या या प्रसिद्ध क्रिकेटपटूच नाव आहे पृथ्वी शॉ. आयपीएलमध्ये पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. मुंबईमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पृथ्वी शॉ विरुद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिलने छेडछाडीचा आरोप केलाय. फेब्रुवारी महिन्यात पृथ्वी शॉ, त्याचे मित्र आणि सपना गिल दरम्यान वादावादी झाली होती. रात्री उशिरा एका हॉटेलबाहेर पृथ्वी शॉ, त्याचे मित्र आणि सपना गिलच्या मित्रांमध्ये हाणामारी झाली होती.

क्रिकेटरवर कुठल्या कलमातंर्गत गुन्हा?

पृथ्वी शॉ विरुद्ध अंधेरी मॅजिस्ट्रेट 66 कोर्टात एफआयआर दाखल झाला आहे. त्याच्या विरुद्ध 3 कलम लावण्यात आली आहेत. आयपीसीच्या 354, 509 आणि 324 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पृथ्वीचा मित्र सुरेंद्र यादव विरोधातही केस दाखल झालीय. सपना गिलला बॅटने मारहाण केल्याचा दोघांवर आरोप आहे. सपना गिलने सरकारी रुग्णालयात मेडिकल करुन त्याची कागदपत्र पुरावे म्हणून कोर्टात सादर केली आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी 17 एप्रिलला होणार आहे.

तिच्यावर काय आरोप?

पृथ्वी शॉ सोबत जबरदस्ती सेल्फी काढण्याचा प्रयत्न केल्याचा सपना गिलवर आरोप आहे. तिच्यावर सुद्धा पृथ्वी आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सपनाला अटक झाली होती. आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलय. याआधी कुठल्या वादात?

पृथ्वी शॉ च वादांशी जुन नातं आहे. पृथ्वी शॉ वर्ष 2021 मध्येही वादात सापडला होता. शॉ वर लॉकडाऊन तोडल्याचा आरोप होता. तो सुट्टया एन्जॉय करण्यासाठी गोव्याला चाललेला. त्याच्यकडे ई-पास नव्हता. पृथ्वी शॉ वर डोपिंगसाठी सुद्धा बंदीची कारवाई झाली होती. वर्ष 2019 मध्य या खेळाडूवर बीसीसीआयकडून 8 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. पृथ्वी शॉ च्या कफ सिरपमध्ये प्रतिबंधित गोष्ट आढळली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.