WPL 2023 Prize Money : फायनल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या टीमला किती कोटी मिळाले? जाणून घ्या अवॉर्ड्सची पूर्ण लिस्ट
WPL 2023 Prize Money : मुंबई इंडियन्सच्या टीमने वूमेन्स प्रीमिअर लीगच्या पहिल्या सीजनच जेतेपद पटकावलं आहे. सुरुवातीपासूनच मुंबईच्या टीमने या टुर्नामेंटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. फक्त विजेतेपदच मिळवलं नाही, तर अवॉर्ड्समध्ये मुंबईच्या खेळाडूंचा जलवा पहायला मिळाला.
WPL 2023 Prize Money : वूमेन्स प्रीमिअर लीगच्या पहिल्या सीजनची काल सांगता झाली. आयपीएल प्रमाणे WPL मध्येही मुंबई इंडियन्सच्या टीमने आपला दबदबा दाखवून दिला. पहिल्या WPL स्पर्धेत पाच टीम्समध्ये 22 सामने झाले. रविवारी 26 मार्चला मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर फायनल सामना झाला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 7 विकेटने हरवलं. टुर्नामेंटच्या इतिहासातील पहिलं विजेतेपद मुंबईच्या टीमने मिळवलं.
सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सच्या टीमने स्पर्धेत आपलं वर्चस्व राखलं. फायनलनंतर अवॉर्ड्समध्येही मुंबईच्या टीमचा जलवा होता. मुंबई इंडियन्सला फक्त कॅश अवॉर्ड मिळाला नाही, तर वेगवेगळ्या खेळाडूंच्या खात्यातही पैशांचा पाऊस पाडला.
मुंबईला इनामापोटी किती कोटी मिळाले?
WPL चा किताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या टीमला फक्त शानदार ट्रॉफीच मिळाली नाही, तर इनामापोटी घसघशीत रक्कमही मिळाली. WPL चॅम्पियन बनल्यानंतर मुंबईच्या टीमला 6 कोटी रुपयांचा चेक मिळाला. उपविजेते दिल्ली कॅपिटल्सला ट्रॉफी आणि 3 कोटींचा चेक मिळाला.
अवॉर्ड्समध्ये मुंबईचा दबदबा
- प्लेयर ऑफ़ द टूर्नामेंट- हॅली मॅथ्यूज, मुंबई इंडियन्स (5 लाख रुपये)
- प्लेयर ऑफ द मॅच- नॅट सिवर-ब्रंट, मुंबई इंडियन्स (2.5 लाख रुपये)
- ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा)- मेग लेनिंग, दिल्ली कॅपिटल्स (5 लाख रुपये)
- पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट) हेली मॅथ्यूज, मुंबई इंडियन्स (5 लाख रुपये)
- एमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन- यास्तिका भाटिया, मुंबई इंडियन्स (5 लाख रुपये)
- कॅच ऑफ द सीजन- हरमनप्रीत कौर, मुंबई इंडियन्स (5 लाख रुपये)
- पावरफुल स्ट्रायकर ऑफ द सीजन- सोफी डिवाइन, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (5 लाख रुपये)
- फेयर प्ले अवॉर्ड- मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (5-5 लाख रुपये)