Team India coach : रिकी पॉन्टिंग टीम इंडियाबद्दल खोट बोलला, जय शाह यांच्याकडून पोल-खोल
Team India coach : सध्या टीम इंडियाच्या हेड कोच पदाचा मुद्दा चर्चेत आहे. वर्ल्ड कप नंतर टीम इंडियाचे विद्यमान कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून नव्या कोचचा शोध सुरु आहे. रिकी पॉन्टिंगने याने काल कोच पदाच्या ऑफरबाबत खुलासा केला होता. आता बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पॉन्टिंगच्या दाव्याची पोल-खोल केलीय.
आता T20 वर्ल्ड कप 2024 सुरु व्हायला काही दिवस उरले आहेत. आतापासूनच वर्ल्ड कपची वातावरण निर्मिती सुरु झालीय. टीम इंडियाने यावेळी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे. असं होणार की नाही? ते जूनच्या शेवटालाच समजेल. पण आता अचानक टीम इंडियाच्या नव्या कोचचा मुद्दा चर्चेत आला आहे. बीसीसीआयने नाव न घेता दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगची पोल-खोल केलीय. वर्ल्ड कप नंतर टीम इंडियाचे विद्यमान कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. नवीन कोच निवडण्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत.
टीम इंडियाच्या हेड कोचचा विषय असेल, तर जागतिक क्रिकेटमधील दिग्गज नावांची चर्चा होण अपेक्षित आहे. काही रिपोर्ट्समधून बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि पूर्व ओपनर गौतम गंभीर यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा करण्यात आला. गौतम गंभीर अजून या विषयावर काहीही बोललेला नाही. पण रिकी पॉन्टिंग यांनी आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणी मोठा दावा केला.
रिकी पॉन्टिंग काय म्हणालेला?
आयपीएल दरम्यान काही लोकांनी टीम इंडियाचा कोच बनण्यासाठी संपर्क साधला होता, असा दावा पॉन्टिंगने केला. त्यांनी माझं मत जाणून घेतलं, असं पॉन्टिंग म्हणाला. पॉन्टिंगने थेट शब्दात बीसीसीआयच नाव घेतलं नाही. पण काही लोकांबरोबर बोलण झालं असं पॉन्टिंग म्हणाला होता.
जय शाह काय म्हणाले?
पॉन्टिंगच्या या दाव्यानंतर आता भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी सत्य काय ते सर्वांसमोर सांगितलं. जय शाह यांनी सुद्धा थेट पॉन्टिंगच नाव घेतलं नाही. मीडियाशी बोलताना जय शाह म्हणाले की, “बीसीसीआय किंवा त्यांनी स्वत: टीम इंडियाचा कोच बनण्यासाठी कुठल्याही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला संपर्क केला नाही. ते सरळ म्हणाले, मीडियामध्ये सुरु असलेली ही चर्चा चुकीची आहे”
टीम इंडियाच्या कोच पदावर बीसीसीआयला कशा प्रकारची व्यक्ती हवी?
टीम इंडियाचा हेड कोच बनण्यासाठी कशा प्रकारची व्यक्ती हवी ते सुद्धा जय शाह यांनी स्पष्ट केलं. “वेगवेगळ्या स्तरावर खेळून वर आलेला तसेच भारतीय क्रिकेटची सखोल समज असलेल्या व्यक्तीचा बीसीसीआय शोध घेत आहे” त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की, “टीम इंडियाचा हेड कोच बनण्यासाठी भारतातील डॉमेस्टिक क्रिकेटची समज आणि ज्ञान असणं आवश्यक आहे”