Mumbai Indians च्या ‘या’ प्लेयरला ODI वर्ल्ड कप टीममध्ये स्थान द्या, रवी शास्त्रींचा महत्त्वाचा सल्ला

ODI World Cup 2023 | वर्ल्ड कप टीममध्ये त्याला घेतल्यास डबल फायदा. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी वर्ल्ड कपची टीम निवडणाऱ्या सिलेक्टर्सना महत्त्वाचा सल्ला दिलाय.

Mumbai Indians च्या 'या' प्लेयरला ODI वर्ल्ड कप टीममध्ये स्थान द्या, रवी शास्त्रींचा महत्त्वाचा सल्ला
Ravi Shastri
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 11:02 AM

मुंबई : टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी 20 मध्ये दोन खेळाडूंनी आपली छाप उमटवली. सकारात्मक आणि बिनधास्त खेळण्याचा त्यांची पद्धत अनेकांना भावली. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुद्धा त्यांच्या खेळाने प्रभावित झाले आहेत. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी वर्ल्ड कपची टीम निवडणाऱ्या सिलेक्टर्सना महत्त्वाचा सल्ला दिलाय. 39, 51, 49, 7 आणि 27 वेस्ट इंडिज विरुद्ध पाच सामन्यांच्या T20 सीरीजमध्ये त्याने हा परफॉर्मन्स केला. सहाजिकच डेब्यु सीरीजमध्ये ही जबरदस्त कामगिरी आहे.

त्यामुळे सहाजिकच तिलक वर्माचा वनडे वर्ल्ड कपसाठी निवडल्या जाणाऱ्या टीममध्ये समावेश करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. रवी शास्त्री यांनी सुद्धा असाच सल्ला दिलाय.

‘हे भारतीय सिलेक्टर्सना माहित’

“कोण फॉर्ममध्ये आहे, हे भारतीय सिलेक्टर्सना माहित आहे. त्यामुळे वर्ल्ड कपसाठी त्यांची निवड करा. तिलक वर्मा फॉर्ममध्ये आहे, तर त्याला निवडा. यशस्वी जैस्वाल फॉर्ममध्ये असेल, तर त्याला सुद्धा निवडा” असं रवी शास्त्री स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले. तिलक वर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो.

त्याला निवडण्याचे दोन फायदे

बॉलवर बिनधास्तपणे प्रहार करणाऱ्या तिलक वर्मामुळे टॉप ऑर्डरमध्ये लेफ्टी बॅट्समनचा पर्याय मिळतो. त्याला निवडल्यास फिरकी गोलंदाजीचा सुद्धा पर्याय मिळेल. तो टीमसाठी जमेची बाजू ठरेल. रवी शास्त्री यांनी यशस्वी जैस्वालला सुद्धा पाठिंबा दिला. टेस्ट आणि टी 20 मध्ये यशस्वीने जोरदार सुरुवात केलीय. त्यामुळे त्याची सुद्धा वनडे वर्ल्ड कप टीममध्ये निवड करावी, असं रवी शास्त्री यांचं मत आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड कधी?

येत्या 5 सप्टेंबरला वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया निवडली जाणार आहे. सुरुवातीला 18 सदस्यीस संघ निवडला जाईल, नंतर अंतिम 15 प्लेयर्सची निवड केली जाईल. तिलक वर्माने वेस्ट इंडिज सीरीजमध्ये तडाखेबंद बॅटिंग दाखवली आहे. त्यामुळे सिलेक्टर्सची डोकेदुखी वाढली आहे. वर्माच नाही, यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन यांचा सुद्धा वनडे वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करावा, असं रवी शास्त्री यांचं मत आहे.

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.