AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेट विश्वावर शोककळा, 33 वर्षीय खेळाडू अश्विन यादवची अकाली एक्झिट!

हैदराबादचा माजी वेगवान गोलंदाज अश्विन यादव (Bowler Ashwin Yadav ) याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वावर सध्या शोककळा पसरली आहे. (Former Hydrabad Cricketer Ashwin yadav pass Away)

क्रिकेट विश्वावर शोककळा, 33 वर्षीय खेळाडू अश्विन यादवची अकाली एक्झिट!
हैदराबादचा माजी वेगवान गोलंदाज अश्विन यादव याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
| Updated on: Apr 25, 2021 | 8:47 AM
Share

मुंबई : हैदराबादचा माजी वेगवान गोलंदाज अश्विन यादव (Bowler Ashwin Yadav ) याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वावर सध्या शोककळा पसरली आहे. आपल्या खास बोलिंग शैलीसाठी अश्विन यादव ओळखला जायचा. अश्विन अवघ्या 33 वर्षांचा होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि त्याची तीन मुले आहेत. (Former Hydrabad Cricketer Ashwin yadav pass Away)

चेहऱ्यावर कायम हसू असणारा खेळाडू गेला…!

भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी अश्विनच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. त्यांनी ट्विट करुन म्हटलंय, “अश्विन यादवच्या जाण्याने मी खूप दुखी झालोय, मला मोठा हादरा बसलाय, एक हसतमुख खेळाडू आपल्यातून निघून गेलाय. तो ‘टीम मॅन’ होता. मी देवाकडे प्रार्थना करतो ती ईश्वराने हा आघात सहन करण्याची ताकद त्याच्या कुटुंबाला देवो. क्रिकेटमध्ये नक्कीच अश्विनची कमी भासेल. ओम शांती”

मला विश्वासच बसत नाही, अश्विन आपल्यात नाही…!

अश्विन यादवचा सहकारी खेळाडू ऑफ स्पिनर विशाल शर्मा यानेही शोक व्यक्त केला. तो म्हणाला, “अश्विनच्या चेहऱ्यावर कायम हसू हसायचं. तो कधी नाराज व्हायचा नाही. त्याला सतत हसतमुख आम्ही पाहिलंय. तो स्थानिक लीगमध्ये खूप उत्तम खेळायचा. मला विश्वासच बसत नाही की तो आता या जगात राहिला नाही”

अश्विनची क्रिकेट कारकीर्द

अश्विन यादवने 2007 मध्ये पंजाबविरुद्ध मोहालीमध्ये रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करणारा यादवने 14 प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यामध्ये त्याने 34 बळी घेतले. 2008-09 च्या हंगामात त्याने उप्पल स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करत 52 धावा देऊन 06 बळी घेतले.

अश्विनने शेवटचा रणजी सामना 2009 मध्ये मुंबई विरुद्ध खेळला. मात्र स्थानिक लीगमध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद व त्यानंतर एसबीआयकडून खेळणे त्याने सुरुच ठेवले. त्याने 10 लिस्ट ए आणि दोन टी -20 सामने खेळले आहेत.

(Former Hydrabad Cricketer Ashwin yadav pass Away)

हे ही वाचा :

Video : हार्दिक पांड्याचा बायकोचा हा डान्सचा व्हिडीओ पाहिलात का?, इंटरनेवर तुफान व्हायरल…!

Video : पॅट कमिन्सचा अवघड कॅच घेतल्यानंतर अति आनंद, रियान परागचं चर्चेतलं हे सेलिब्रेशन नक्की बघा…!

IPL Purple Cap : दिग्गजांना पछाडत भारतीय युवा बोलर्स अग्रस्थानी, बॅट्समनचा ठरतोय कर्दनकाळ!

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.