IPL 2022: डान्स, राड्यामुळे चर्चेत राहणाऱ्या श्रीसंतने ऑक्शनसाठी केलं रजिस्ट्रेशन, बेसप्राइसचा आकडाच इतक्या लाखांचा

भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने (S Sreesanth) IPL च्या ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे.

IPL 2022: डान्स, राड्यामुळे चर्चेत राहणाऱ्या श्रीसंतने ऑक्शनसाठी केलं रजिस्ट्रेशन, बेसप्राइसचा आकडाच इतक्या लाखांचा
s.sreesanth (Twitter)
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 7:55 PM

मुंबई: भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने (S Sreesanth) IPL च्या ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. श्रीसंत आयपीएलमध्ये शेवटचं 2013 साली राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळला होता. IPL 2021 च्या ऑक्शनमध्येही त्याने रजिस्ट्रेशन केलं होतं. श्रीसंतने त्याची बेस प्राइस 50 लाख ठेवली आहे. इएसपीएन-क्रिकइन्फोने ही माहिती दिली आहे. केरळकडून रणजी स्पर्धा 2021-22 मध्ये श्रीसंत पुनरागमन करणार होता. पण सध्या कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

आतापर्यंत किती विकेट काढल्या

श्रीसंत केरळकडून 2020/21 च्या सीजनमध्ये खेळला होता. श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोची टस्कर्स केरळकडून खेळला आहे. टी-20 स्पर्धेत 44 सामन्यात त्याने 40 विकेट घेतल्यात. 2007 च्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा श्रीसंत भाग होता. श्रीसंतने 10 टी-20 सामन्यात 7 विकेट काढल्या आहेत. 65 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 54 विकेट काढल्यात.

आयपीएलच्या मेगा ऑक्शनआधी 1213 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं आहे. यात 49 खेळाडूंनी त्यांची बेस प्राईस 2 कोटी ठेवली आहे. यात युजवेंद्र चहल, दिनेश कार्तिक, इशान किशन, दीपक चहर, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडीकल, कुणाल पांड्या, हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, रॉबिन उथाप्पा आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन पार पडणार आहे.

मुंबई-पुण्याचा पर्याय व्यवहार्य का? आयपीएल 2022 च्या आयोजनासाठी मुंबई आणि पुणे या दोन शहरांना बीसीसीआयने प्राधान्य दिलं आहे. या दोन शहरात सामने भरवण्याचा पर्याय व्यवहार्य आहे. फक्त रस्ते मार्गाने प्रवास होईल व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवासातील धोके टाळता येतील. कोरोनामुळे देशातील आयपीएल स्पर्धा गुंडाळावी लागली, तर फ्रेंचायजींच प्राधान्य दक्षिण आफ्रिका आणि यूएई या दोन देशांना आहे. बीसीसीआय श्रीलंकेचा सुद्धा विचार करतेय.

मुंबईचं वानखेडे स्टेडियम, त्याच्या जवळच असलेलं ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील आणि पुणे गहुजे येथे असलेलं महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचं स्टेडियम या चार मैदानांवर संपूर्ण IPL चा सीजन खेळवण्याचा BCCI चा विचार आहे.

Former India pacer S Sreesanth registers for IPL 2022 auction with base price of Rs 50 lakh

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.