Saeed Anwar : नोकरी करणाऱ्या महिलांबाबत प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटू सईद अनवरच वादग्रस्त वक्तव्य

Saeed Anwar : पाकिस्तानचा प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सईद अनवरने नोकरी करणाऱ्या महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोशल मीडियावर सईद अनवरचा व्हिडिओ व्हायरल होतोय. अनेक लोकांनी सईद अनवरच्या या विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.

Saeed Anwar : नोकरी करणाऱ्या महिलांबाबत प्रसिद्ध पाकिस्तानी  क्रिकेटपटू सईद अनवरच वादग्रस्त वक्तव्य
Saeed Anwar
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 2:59 PM

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईद अनवर वादात सापडला आहे. त्याने नोकरी करणाऱ्या महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलय. सोशल मीडियावर त्याच हे स्टेटमेंट व्हायरल होतय. सईद अनवरने महिला सशक्तीकरण आणि आर्थिक स्वातंत्र्याबद्दल टिप्पणी केली आहे. वर्कफोर्समध्ये महिलांच्या सहभागावर आपला विचार करताना सईद अनवरने वादग्रस्त टिप्पणी केली. सोशल मीडियावर सईद अनवरचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यात त्याने घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केलीय. सईद अनवरने घटस्फोटांसाठी महिलांच घराबाहेर पडून काम करणं आणि आर्थिक स्वातंत्र्याला जबाबदार ठरवलं आहे.

“मी जगात अनेक देशांचा दौरा केलाय. मी आताच ऑस्ट्रेलिया, युरोपहून परतलोय. युवा पीडित आहेत. कुटुंबांची स्थिती वाईट आहे. जोडप्यांमध्ये भांडण होतायत. परिस्थिती इतकी खराब आहे की, पैशांसाठी महिलांकडून काम करुन घ्याव लागतय” असं सईद अनवरने म्हटलय. हे वर्ष 2024 आहे आणि क्रिकेटर सईद अनवर असा विचार करतात की, ‘महिलांनी वर्कफोर्सचा भाग बनणं हे समाजाला नष्ट करण्याचा एक गेम प्लान आहे’

कोणी अनवरची चिंता गांभीर्याने घेतली?

सईद अनवरच्या या टिप्पणीवरुन वाद सुरु झालाय. अनेक लोकांनी सईद अनवरच्या या विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. काहींनी अनवरची बाजू घेत त्याने व्यक्त केलेल्या चिंतेला गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केलीय.

भारताविरुद्ध फटकावलेल्या 194 धावा

सईद अनवर पाकिस्तानचा सर्वश्रेष्ठ वनडे फलंदाज आहे. त्याच्या नावावर 20 शतक आहेत. त्याने 247 एकदिवसीय सामन्यात 8,824 धावा केल्या आहेत. 91 कसोटी सामन्यात 11 शतकासह 4,052 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये सलग तीन शतक झळकवणाऱ्या फलंदाजांमध्ये सईद अनवरचा समावेश होतो. 1993 साली शारजाहमध्ये चॅम्पिन्स ट्रॉफी स्पर्धेत श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध शतक झळकवलं. भारताविरुद्ध वनडेमध्ये व्यक्तीगत 194 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.