AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी, आयपीएल बंद होणार?

क्रिकेट विश्वात आयपीएलला मिळालेल्या यशानंतर प्रत्येक देशात टी 20 लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या लीग स्पर्धेमुळे अनुभवींसह युवा खेळाडूंनाही आपल्यातील हुनर दाखवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं.

क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी, आयपीएल बंद होणार?
| Updated on: Feb 06, 2023 | 9:23 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने मोठं विधान केलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटपेक्षा टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेला खेळाडूंची पसंती फार काळ टिकणार नाही, असं गांगुलीने म्हटलं. भविष्यात आर्थिक गणित पाहता काही मोजक्याच लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडू हे लीग स्पर्धेऐवजी देशासाठी खेळण्याला अधिक प्राधान्य देत आहेत.

गांगुलीची भविष्यवाणी

बिग बॅश लीगनंतर आता यूएई आणि दक्षिण आफ्रिकेत लीग होत आहे. याशिवाय वर्षाअखेर अमेरिकेतही लीग स्पर्धेचं आयोजनाची तयारी सुरु आहे.

“आम्ही जगभरात होणाऱ्या लीग क्रिकेटबाबत बोलत आहोत. आयपीएल पूर्णपणे वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग उत्तमप्रकारे सुरु आहे. तर ब्रिटेनमध्येही ‘द हंड्रेड’ उत्तम चाललंय. दक्षिण आफ्रिका लीगही चांगलं चाललंय. या सर्व लीग स्पर्धा त्याच देशात होत आहे, जिथे क्रिकेट लोकप्रिय आहे. मला वाटतं की येत्या 4-5 वर्षात काही मोजक्याच लीग सुरु राहतील, तसेच त्या कोणत्या लीग आहेत, हे म्ला माहितीय”, अशी भविष्यवाणी गांगुलीने केली.

“सध्या खेळाडू नव्याने सुरु होणाऱ्या लीग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सूक आहेत. मात्र येत्या काळात त्यांना समजेल की प्राधान्य कशाला द्यायचं ते. त्यामुळे देशासाठी लीग स्पर्धेचा त्याग केला जाईल”, असं गांगुलीने नमूद केलं.

गांगुलीने क्रिकेट मॅनेजमेंटचं महत्त्व पटवून सांगताना झिंबाब्वेचं उदाहरण दिलं जिथे मॅनेजमेंटमुळे झिंबाब्वे क्रिकेट टीमला उतरती कळा लागली. “मी 5 वर्ष बंगाल क्रिकेट संघाचा अध्यक्ष होतो. त्यानंतर 3 वर्ष बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मी आयसीसीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय. मी तिथे पाहिलंय की मदत आणि भक्कम पायाशिवाय क्रिकेट शक्य नाही”, असंही गांगुलनी स्पष्ट केलं.

टीम मॅनेजटमेंटबाबत काय म्हणाला?

“मी पहिल्यांदा 1999 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलो. झिंबाब्वे तेव्हा कुणालाही पराभूत करु शकत होतं. त्यावेळेस झिंबाब्वेकडे फार पैसे नव्हते, तसेच भारताकडेही नव्हते. विंडिजकडे मायकल होल्डिंग, एंडी रॉबटर्स-जोएल गार्नर यांच्यावेळेस आर्थिक स्थिती चांगली नव्हती. खेळाडूंसाठी चांगलं मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. आर्थिक स्थितीचा काही विषय नाही. खेळाडू आणि मॅनेजमेंट यांच्यातील चांगल्या संबंध हे समस्या सुटू शकतात”, असं गांगुलीने म्हटलं.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.