6 Wickets 1 Over | एका ओव्हरमध्ये 6 विकेट्स, बॉलरने टीमला गमावलेला सामना जिंकवला

6 Wickets in 6 Balls | क्रिकेटमध्ये कधी काय होईल, हे सांगता येत नाही. तसेच जोवर शेवटचा चेंडू टाकला जात नाही, तोवर सामना कोण जिंकणार हे सांगता येत नाही, असं म्हटलं जातं. या वाक्याचीच प्रचिती ही साऱ्या क्रिकेट विश्वाला आली आहे. गोलंदाजांने वर्ल्ड कप दरम्यान इतिहास रचला.

6 Wickets 1 Over | एका ओव्हरमध्ये 6 विकेट्स, बॉलरने टीमला गमावलेला सामना जिंकवला
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 11:08 PM

कॅनबेरा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील साखळी फेरीचं समारोप झाला आहे. साखळी फेरीतील 45 सामन्याचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं. देशातील 9 स्टेडियममध्ये हा सामने खेळवण्यात आले. या साखळी फेरीतून 6 संघ बाहेर पडले. तर 4 संघांनी वर्ल्ड कप 2023 सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं. या 4 संघांमध्ये टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सेमी फायनल सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे.

वर्ल्ड कप 2023 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल याने एकहाती सामना जिंकून दिला. ऑस्ट्रेलियाने गमावलेला सामना ग्लेन मॅक्सवेल याने नाबाद द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियातील एका गोलंदाजाने इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियातील या गोलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये डबल हॅटट्रिक अर्थात 6 बॉलमध्ये 6 विकेट्स घेत कीर्तीमान केला आहे.

ऑस्ट्रेलियात थर्ड डिव्हीजन क्लब क्रिकेट सामन्यात एका ओव्हरमध्ये 6 विकेट्स घेण्याचा कारनामा गोलंदाजाने केला आहे. या सामन्यात मुदगीराबा नेरांग एंड डिस्ट्र्रीक्ट्स क्रिकेट क्लब विरुद्ध सरफर्स पॅराडाईज यांच्यात होते.या सामन्यात सरफर्स पॅराडाईजला विजयासासाठी अखरेच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 5 धावांची गरज होती. तर 4 विकेट्स गमावल्या होत्या. आता टीम सहज जिंकणार हे स्पष्ट होते. मात्र त्यानंतर जे झालं त्याने इतिहास घडला.

ऑस्ट्रेलियाई गेंदबाज ने लिए 6 गेंदों पर 6 विकेट, हारा हुआ मैच जीती टीम

गॅरेथ मॉर्गन याची ऐतिहासिक कामगिरी

मुदगीराबा नेरांग एंड डिस्ट्र्रीक्ट्स क्रिकेट क्लब टीमचा कर्णधार गॅरेथ मॉर्गन याने अखेरची ओव्हर टाकली. गॅरेथने या ओव्हरमधील 6 चेंडूमध्ये 6 विकेट्स घेत सरफर्स पॅराडाईजला ऑल आऊट केलं. यासह मॉर्गनने टीमला अशक्य असा विजय मिळवून दिला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.