प्रशिक्षक गौतम गंभीरची स्तुती करताना आर अश्विनने सांगितली आतली गोष्ट, म्हणाला ‘राहुल द्रविड…’

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. 27 सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून भारतीय संघ कानपूरला पोहोचला आहे. यावेळी फिरकीपटू आणि पहिल्या सामन्याचा हिरो असलेल्या आर अश्विनने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि राहुल द्रविडबाबत एक खुलासा केला आहे.

प्रशिक्षक गौतम गंभीरची स्तुती करताना आर अश्विनने सांगितली आतली गोष्ट, म्हणाला 'राहुल द्रविड...'
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 8:58 PM

बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामन्यात आर अश्विनने चमकदार कामगिरी केली होती. शतकी खेळीसह दुसऱ्या डावात सहा विकेट घेतल्या होत्या. आता आर अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने स्वत:च्या हिंदी यूट्यूब चॅनेलवर एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. यावेळी त्याने माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि गौतम गंभीर यांची तुलना करत एक उलगडा केला आहे. त्यामुळे क्रीडारसिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शांत स्वभावाचा राहुल द्रविड कठोर असल्याचं सांगितलं आहे. त्या उलट गौतम गंभीरचा उल्लेख शांत म्हणून केला आहे. आर अश्विनने सांगितलं की, राहुल द्रविड कडक शिस्तीचा होता. तर गंभीर रँचोसारखा कूल आहे. रँचो हे थ्री इडियट्स चित्रपटातील एक पात्र आहे. हे पात्र आमिर खानने साकारलं होतं आणि कोणतंही टेन्शन न घेता काम करत होतं. गौतम गंभीर असाच असल्याचं आर अश्विनने सांगितलं आहे.

आर अश्विनने सांगितलं की, ‘गौतम गंभीर खूपच शांत आहे. मी त्याचा रिलॅक्स्ड रँचो असा उल्लेख करेल. त्याच्या उपस्थितीत दबाव येत नाही. सकाळच्या संघाच्या बैठकीबाबत गंभीर खूपच शांत असतो. तो विचारतो की, तु्म्ही सकाळच्या मीटिंगला येणार का? प्लीज य़ा.’ या उलट द्रविड कठोर आणि काटेकोरपणाचा पालन करणारा होता. अश्विनने सांगितलं की, द्रविड सर्व वस्तू व्यवस्थित ठेवायचा. विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी बाटली ठेवावी अशी त्याची इच्छा असायची. या बाबतीत तो अतिशय शिस्तप्रिय होता. अश्विनने सांगितले की, गौतम गंभीर फार कठोर नाही, तो सर्वांची काळजी घेतो आणि संघातील सर्व खेळाडू त्याच्यावर प्रेम करतील.

आर अश्विनच्या या खुलाशानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण गौतमचा चेहरा कायम धीर गंभीर असल्याचं पाहायला मिळाला आहे. इतकंच काय तर मैदानातही त्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेकदा विरोधकांना शिंगावर घेण्याची वृत्ती पाहिली गेली आहे. त्यामुळे त्याचा स्वभाव याच्या विपरीत असल्याचं ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल यात शंका नाही. द्रविड कठोर असला तरी त्याच्या प्रशिक्षकपदाच्या कारकि‍र्दीत भारताने यशाची शिखरं गाठली आहेत. भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला. तसेच वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. आता गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे लक्ष लागून आहे.

'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल.
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'.
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या.
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?.
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर.
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल.
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले.
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार.
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'.