Shane Warne Death : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न याचं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा
ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न यांचे निधन झालं आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियचा महान फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याचे निधन झाले आहे. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तो 52 वर्षांचा होता. वॉर्नच्या व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियन मीडियाला दिलेल्या निवेदनात पुष्टी केली आहे की, “शेन थायलंडमधील व्हिलामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. त्याला हृदयविकाराचा झटका (cardiac arrest) आला होता.”
ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनल फॉक्स स्पोर्टच्या वृत्तानुसार, शेन वॉर्न थायलंडमध्ये होता आणि तेथे त्याचा अचानक संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. शेन वॉर्नच्या व्यवस्थापन संस्थेच्या हवाल्याने फॉक्स स्पोर्टने एका निवेदनात म्हटले आहे की, वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जेथे तो शनिवारी सकाळी (ऑस्ट्रेलियन वेळेनुसार) बेशुद्धावस्थेत आढळला होता, परंतु वैद्यकीय पथकाच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही तो शुद्धीवर येऊ शकला नाही.
निवेदनानुसार, शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई बेटावर होता आणि तिथे त्याच्या व्हिलामध्ये राहत होता. शेन वॉर्नच्या कुटुंबीयांनी गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले असून उर्वरित माहिती योग्य वेळी उपलब्ध करून दिली जाईल, असे म्हटले आहे.
विरेंद्र सहवागकडून श्रद्धांजली
दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सहवागने याबाबत ट्विट दुःख व्यक्त केलं आहे. त्याने लिहिलं आहे की, “विश्वासच बसत नाही. महान फिरकीपटूंपैकी एक, फिरकीला कूल बनवणारा, सुपरस्टार शेन वॉर्न राहिला नाही. जीवन खूप नाजूक आहे, परंतु हे समजणे फार कठीण आहे. त्याचं कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना.”
Cannot believe it. One of the greatest spinners, the man who made spin cool, superstar Shane Warne is no more. Life is very fragile, but this is very difficult to fathom. My heartfelt condolences to his family, friends and fans all around the world. pic.twitter.com/f7FUzZBaYX
— Virender Sehwag (@virendersehwag) March 4, 2022
1992 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण
शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
इतर बातम्या
IND vs SL 1st Test: क्षणभर कोहलीलाही नाही समजलं, विराट बोल्ड झाला ‘त्या’ अप्रतिम चेंडूचा पहा VIDEO