GT vs CSK IPL 2023 Final : 29 मे ला फायनल हे धोनीसाठी खराब नशीबाच लक्षण? तारखांचा योगायोग देतायत वाईट संकेत

GT vs CSK IPL 2023 Final : दुसऱ्याबाजूला 29 मे ही तारीख हार्दिक पांड्या आणि त्याच्या टीमसाठी खूप स्पेशल आहे. 2011 साली 28 मे रोजी CSK साठी काय घडलेलं? ते जाणून घ्या.

GT vs CSK IPL 2023 Final : 29 मे ला फायनल हे धोनीसाठी खराब नशीबाच लक्षण? तारखांचा योगायोग देतायत वाईट संकेत
GT vs CSK IPL 2023 Final (2)Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 10:25 AM

अहमदाबाद : IPL 2023 ची फायनल 28 मे रोजी होती. पण आता हा सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. पावसामुळे हा सामना रिझर्व्ह डे ला होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच होणार आहे. पाऊस काल संध्याकाळी सुरु झाला, तो थांबलाच नाही. त्यामुळे काल फायनल मॅच होऊ शकली नाही. आता फायनल सामना 29 मे रोजी होणार, हा एक अजब योगायोग आहे. कदाचित एमएस धोनीला नशिबाची साथ नाहीय, असं सुद्धा काहीजण म्हणतायत.

आम्ही असं का म्हणतोय? असा तुम्ही विचार कराल. गुजरात टायटन्स टीमच 29 मे या तारखेशी खास कनेक्शन हे त्यामागे कारण आहे. ही तारीख हार्दिक पांड्या आणि त्याच्या टीमसाठी खास आहे. 28 मे ही तारीख धोनीसाठी खास होती, तशीच 29 मे हार्दिकसाठी स्पेशल आहे.

28 मे ला फायनल झाली असती, तर सीएसकेसाठी चांगलं ठरल असतं

28 मे रोजी होणाऱ्या फायनलआधी अनेक क्रिकेट पंडितांनी चेन्नई सुपर किंग्सला विजेतेपदाच दावेदार म्हटलं होतं. प्रत्येकाच आपलं एक कारण होतं. पण CSK च 28 तारखेशी एक कनेक्शन आहे. याच तारखेला 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच विजेतेपद मिळवलं होतं. त्यांनी टायटल डिफेंड केलं होतं. अशी कामगिरी करणारा चेन्नई पहिला संघ ठरला होता.

29 मे रोजी धोनीच नशीब खराब असू शकतं

IPL 2023 ची फायनल आता 29 मे रोजी खेळली जाणार आहे. याच तारखेला मागच्यावर्षी गुजरात टायटन्स पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन बनली होती. त्यांनी राजस्थान रॉयल्सला नमवून आयपीएल 2022 चा किताब जिंकला होता. महत्वाच म्हणजे ही मॅच अहमदाबादच्या मैदानातच झाली होती. याच मैदानावर आज फायनल होणार आहे. तारखांचा योगायोग

तारखांचा योगायोग आणि नशिबाचा विचार केल्यास, 29 मे रोजी हार्दिक पांड्याच पारड जड वाटतय. कारण गुजरातने ज्या तारखेला किताब जिंकला, त्याच मैदानात डिफेंड करण्याची संधी आहे. 29 मे रिझर्व्ह डे आहे. आज मॅच झाली नाही, तर गुजरात टायटन्सला विजेता म्हणून जाहीर केलं जाईल.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.