GT vs CSK IPL 2022: MS Dhoni ला कधी लेगस्पिन गोलंदाजी करताना पाहिलय का? Watch VIDEO

GT vs CSK IPL 2022: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज डबल हेडर सामने आहेत. आज रविवारी दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सीएसके (GT vs CSK) मध्ये होणार आहे.

GT vs CSK  IPL 2022: MS Dhoni ला कधी लेगस्पिन गोलंदाजी करताना पाहिलय का? Watch VIDEO
सीएसके एमएस धोनी Image Credit source: Screengrab
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 2:16 PM

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज डबल हेडर सामने आहेत. आज रविवारी दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सीएसके (GT vs CSK) मध्ये होणार आहे. दोन ऑलराऊंडर खेळाडूंमधील नेतृत्व कौशल्याची ही लढाई असेल. रवींद्र जाडेजा चेन्नई सुपर किंग्स तर हार्दिक पंड्या (Hardik pandya) गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणार आहे. चेन्नई आयपीएलमधील गतविजेता संघ आहे. गुजरात टायटन्सचा हा पहिलाच सीजन आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. सीएसकेची मॅच असली, की महेंद्रसिंह धोनीची नेहमीच चर्चा होते. एमएस धोनीने आता कॅप्टनशिप सोडली आहे, तरी मैदानावरील त्याचा वावर खूप महत्त्वाचा असतो. टीम अडचणीत असताना, धोनी नेहमी सल्लागाराच्या भूमिकेत दिसतो. यंदाच्या सीजनची सीएसकेसाठी फार चांगली सुरुवात झाली नाहीय. पहिले चार सामने त्यांनी गमावले. पण पाचव्या सामन्यात त्यांना विजय मिळाला.

गुजरातची टीम फॉर्ममध्ये

हीच विजयी लय कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांची तुलना केल्यास, सध्या गुजरात टायटन्सचा संघ उजवा वाटतो. कारण त्यांनी पाच पैकी चार विजय मिळवलेत. त्यांचा खेळ पाहून तो आयपीएलमध्ये डेब्यू करणारा संघ आहे, असं वाटतच नाही. सीएसकेच्या फलंदाजांसमोर आज लेग स्पिनर राशिद खानचे आव्हान असेल.

धोनीच्या व्हिडिओची चर्चा

दरम्यान मॅचची तयारी सुरु असताना एमएस धोनीचा एक व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. मैदानात धोनीला तुम्ही नेहमी फलंदाजी आणि स्टम्पसपाठी यष्टीरक्षण करताना पाहता. सीएसकेने पोस्ट केलेल्या व्हिडिओत धोनी चक्क गोलंदाजी करतोय. ती ही लेग स्पिन गोलंदाजी. धोनी फार कमी वेळा मैदानात असं काहीतरी वेगळ करताना दिसतो. पण त्याच्या त्या कृतीची चर्चा होते. आताही धोनीच्या या व्हिडिओची चर्चा आहे.

गुजरात टायटन्सचा आजचा संभाव्य संघ

शुभमन गिल, मॅथ्यू वेड, विजय शंकर, हार्दिक पंडया (कॅप्टन), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल

चेन्नई सुपर किंग्सचा आजचा संभाव्य संघ

ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथाप्पा, मोइन अली, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा (कॅप्टन), अंबाती रायुडू, एमएस धोनी, ड्वेयन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महेश तीक्ष्णा, मुकेश चौधरी,

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.