Chennai Super Kings IPL 2023 Final : एमएस धोनी पुन्हा चॅम्पियन बनेल, ‘या’ 5 गोष्टींमुळे त्याची CSK जास्त खतरनाक

Chennai Super Kings IPL 2023 Final : मोठे प्लेयर नाही, धोनीची बुद्धी CSK ला बनवेल चॅम्पियन. CSK पासून गुजरात टायटन्स आपलं टायटल कसं डिफेंड करणार? CSK ची टीम या 5 गोष्टींमुळे जास्त धोकादायक आहे.

Chennai Super Kings IPL 2023 Final : एमएस धोनी पुन्हा चॅम्पियन बनेल, 'या' 5 गोष्टींमुळे त्याची CSK जास्त खतरनाक
GT vs CSK IPL 2023 Final Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 12:25 PM

अहमदाबाद : IPL 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध आहे. ही मॅच अहमदाबादमध्ये होणार आहे. फक्त या एका आधारावर गुजरात टायटन्सची बाजू वरचढ आहे, असं म्हणता येणार नाही. मागच्या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सला हरवून गुजरात टायटन्सची टीम चॅम्पियन बनली होती. यावेळी त्यांच्यासमोर चेन्नई सुपर किंग्सला नमवण्याच आव्हान आहे. CSK एक अनुभवी आणि मजबूत संघ आहे.

IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने सुद्धा गुजरात टायटन्स सारख प्रदर्शन केलय. IPL 2023 च्या पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स पहिल्या आणि चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या नंबरवर होती. आता प्रश्न हा आहे की, CSK पासून गुजरात टायटन्स आपलं टायटल कसं डिफेंड करणार. CSK ची टीम या 5 गोष्टींमुळे जास्त धोकादायक आहे.

चेन्नई सुपर किंग्सची खरी ताकत त्यांच्या कॅप्टनमध्ये आहे. लीगच्या 10 कॅप्टनसमध्ये धोनी पूर्णपणे वेगळा आहे. मैदानावर धोनीकडून घेतले जाणारे निर्णय CSK च्या विजयाला कारणीभूत ठरतात. धोनी आपल्या प्लेयर्सचा अचूकतेने वापर करतो. कॅप्टनशिपशिवाय धोनीकडे सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याचा अनुभव आहे.

CSK च्या फायनल पर्यंतच्या प्रवासात त्यांच्या ओपनिंग जोडीचा महत्वाचा रोल आहे. ऋतुराज गायकवाड आणि लेफ्टी डेवॉन कॉनवे यांनी अनेक मॅचमध्ये दमदार ओपनिंग दिली आहे. IPL 2023 मध्ये 70 ते 75 टक्के रन्स याच दोन बॅट्समनच्या बॅटमधून निघाले आहेत.

तृषार देशपांडे आणि मथीसा पाथिराना या खेळाडूंनी चेन्नईला कधीच ही जाणीव होऊ दिली नाही, की त्यांच्याकडे मॅच विनर्स बॉलर नाहीयत. तृषार पावरप्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी करतो, तर पाथिराणा डेथ ओव्हर्समध्ये. IPL मध्ये डेब्यु करणाऱ्या पाथिराणा डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाज बनलाय.

ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे धावांच्या राशी उभारतच आहेत. पण शिवम दुबेने सुद्धा चेन्नईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावलीय. शिवम दुबेने चालू सीजनमध्ये चौकार कमी सिक्स जास्त मारलेत.

शेवटचा आणि महत्वाचा पॉइंट अनुभव. गुजरात टायटन्सच्या तुलनेत CSK कडे जास्त अनुभव आहे. IPL फायनल खेळून त्या जिंकण्याचा अनुभव त्यांत्याकडे जास्त आहे.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.