Ruturaj Gaikwad Play MPL : IPL 2023 नंतर ‘या’ लीगमध्ये पाहता येणार पुण्याच्या ऋतुराजची धमाकेदार बॅटिंग

Ruturaj Gaikwad Play MPL : लग्नामुळे WTC फायनलसाठी जाता येणार नाही. इंग्लंडला जाता येणार नाही, हे दु:ख विसरण्याचा प्लान तयार. महाराष्ट्राचे कुठले टॉप प्लेयर या लीगमध्ये खेळणार?

Ruturaj Gaikwad Play MPL : IPL 2023 नंतर 'या' लीगमध्ये पाहता येणार  पुण्याच्या ऋतुराजची धमाकेदार बॅटिंग
Ruturaj Gaikwad Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 1:35 PM

मुंबई : IPL 2023 मध्ये बिझी असलेल्या ऋतुराज गायकवाडला फायनलआधी मोठा झटका बसलाय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून ऋतुराज बाहेर गेलाय. फायनलसाठी तिसरा ओपनर म्हणून त्याचा स्क्वाडमध्ये समावेश केला होता. पण आता त्याच्या जागी यशस्वी जैस्वालची निवड झाली आहे. ऋतुराज गायकवाडच्या लग्नामुळे हा बदल झालाय. तो येत्या 3 किंवा 4 जूनला विवाह बंधनात अडकू शकतो. ऋतुराज गायकवाडला लग्नानंतर टीममध्ये यायचं होतं. पण हेड कोच राहुल द्रविड यांनी रिप्लेसमेंटची मागणी केली.

लग्नानंतर ऋतुराज गायकवाडचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग बंद झालाय. पण लग्नानंतर तो फ्रेंचायजी क्रिकेट खेळताना दिसू शकतो. आता महाराष्ट्र प्रीमियर लीगला (MPL) सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनशी संबंधित खेळाडू या लीगमध्ये सहभागी होतील.

महाराष्ट्राचे कुठले टॉप प्लेयर्स खेळणार?

15 जूनपासून ही टुर्नामेंट सुरु होणार आहे. 6 टीम्सच्या या टुर्नामेंटसाठी 6 जूनला ऑक्शन होईल. महाराष्ट्राचे टॉप क्रिकेटर्स केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, राज्यवर्धन हंगरगेकर या टुर्नामेंटध्ये खेळणार आहेत.

गायकवाडच काय म्हणणं होतं?

ऋतुराज गायकवाड आय़पीएलपासून शानदार फॉर्ममध्ये आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल त्याच्यासाठी एक चांगला अनुभव ठरली असती. त्याने इंग्लंडला जाऊन स्क्वाडमध्ये दाखल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. माीडिया रिपोर्ट्सनुसार, 5 जूनपर्यंत त्याला इंग्लंडला जायच होतं. पण द्रविड यांनी थेट रिप्लेसमेंटची मागणी केली. यशस्वी जैस्वालला नशिबाची साथ

राजस्थान रॉयल्सचा तुफानी फलंदाज यशस्वी जैस्वालला भारतीय टीम मॅनेजमेंटने रेड बॉलने प्रॅक्टिस सुरु करायला सांगितली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 7 ते 11 जून दरम्यान होणार आहे. भारतासमोर ऑस्ट्रेलियाच आव्हान आहे. ऋतुराजच्या जागी यशस्वी जैस्वाल इंग्लंडला जाणार आहे. यशस्वी जैस्वालने आयपीएलच्या 14 मॅचेसमध्ये 625 धावा केल्या आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने 5 सामन्यात 404 धावा केल्या आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.