AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची ताकदच ठरतेय त्याची कमजोरी, अंदाच चुकला अन् दांड्या उडाल्या, पाहा Video

मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामधील सामन्यात गुजरातने 62 धावांनी  विजय मिळवत फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. गुजरातने 233 धावांचं भलं मोठं आव्हान मुंबईसमोर ठेवलं होतं. मुंबईची बॅटींग पाहता त्यांनी साखळी सामन्यांमधे चारवेळा 200 पेक्षा जास्त धावांचं आव्हान पार केलं होतं. मात्र आज काही त्यांची बॅटींग झाली नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टार प्लेअर सूर्यकुमार […]

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची ताकदच ठरतेय त्याची कमजोरी, अंदाच चुकला अन्  दांड्या उडाल्या, पाहा Video
| Updated on: May 27, 2023 | 1:39 AM
Share

मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामधील सामन्यात गुजरातने 62 धावांनी  विजय मिळवत फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. गुजरातने 233 धावांचं भलं मोठं आव्हान मुंबईसमोर ठेवलं होतं. मुंबईची बॅटींग पाहता त्यांनी साखळी सामन्यांमधे चारवेळा 200 पेक्षा जास्त धावांचं आव्हान पार केलं होतं. मात्र आज काही त्यांची बॅटींग झाली नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टार प्लेअर सूर्यकुमार यादव आज परत एकदा सुपला शॉट खेळताना आऊट झाला.

सूर्याने आणि ग्रीन यांनी एक चांगली भागीदारा केली होती. सूर्यकुमार मैदानात होता तेव्हा सामन्यावर मुंबईची पकड असल्यासारखं वाटत होतं.  38 चेंडूत सूर्याने 61 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले मात्र सुपला शॉट मारण्याच्या नादात तो बोल्ड आऊट झाला. सूर्याची सुपला शॉट मारण्याची ताकद आहे मात्र हीच ताकद त्याची आता कमजोरी होताना दिसत आहे.

गुजरातने 20 षटकात 3 गडी गमवून 233 धावा केल्या आणि विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं. पण मुंबईचा संघ 171 धावा करू शकला. शुबमन गिलचं शतक आणि मोहित शर्माच्या पाच विकेट्सने मुंबई सामन्यात बॅकफूटला गेली आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मढवाल.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.