GT vs RR, IPL 2022, qualifier-1: भर मैदानात Riyan parag अश्विनवर वैतागला, जाब विचारला, नेटीझन्स भडकले, पहा VIDEO
GT vs RR, IPL 2022, qualifier-1: जोस बटसरला चौकार-षटकाराने शेवट करायचा होता. पण तो चौकार मारण्यात अपयशी ठरला. यश दयालच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो रनआऊट झाला.
मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगच्या 15 व्या हंगामात काल क्वालिफायर 1 (IPL Qualifier 1) चा पहिला सामना झाला. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (GT vs RR) ही मॅच झाली. गुजरातने हा सामना 7 विकेट आणि 3 चेंडू राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने 20 षटकात 7 बाद 188 धावा केल्या होत्या. गुजरात टायटन्सला विजयासाठी 189 धावांचं टार्गेट दिलं होतं. या सामन्यात राजस्थानच्या डावाचा शेवट खूप विचित्र झाला. शेवटचा चेंडू टाकण्याआधी दोन रनआऊट झाले. आधी जोस बटलर रनआऊट झाला. त्यानंतर रियान पराग. (Riyan parag) शेवटच्या चेंडूआधी ड्रामा पहायला मिळाला. रियान पराग रनआऊट झाल्यानंतर अश्विनवर वैतागला. आपल्या रनआऊट होण्याला अश्विन जबाबदार आहे, असं त्याचं म्हणणं होतं. रियान परागची ही कृती अनेकांना आवडलेली नाही.
अश्विन क्रिझवर होता
जोस बटसरला चौकार-षटकाराने शेवट करायचा होता. पण तो चौकार मारण्यात अपयशी ठरला. यश दयालच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो रनआऊट झाला. अल्झारी जोसेफने वृद्धिमान साहाकडे चेंडू थ्रो केला. त्यात बटलर रनआऊट झाला. यश दयालने टाकलेला हा चेंडू नो बॉल असल्याने पुन्हा शेवटचा चेंडू टाकावा लागणार होता. अश्विन क्रिझवर होता. नॉन स्ट्राइकवर रियान पराग उभा होता.
अश्विनला जाब विचारला
यशने पुढचा चेंडू वाईड बॉल टाकला. पण रियान परागने क्रीझ सोडला होता. तो अश्विनपर्यंत जाऊन पोहोचला. साहाने तो बॉल पकडला व गोलंदाजाकडे थ्रो केला. यशने परागला रनआऊट केलं. त्यानंतर रियान पराग भडकला. तो अश्विनला जाब विचारताना दिसला.
परागकडे Attitude विराट कोहलीसारखा
रियान परागची ही कृती नेटीझन्सना अजिबात आवडली नाही. त्यांनी पुन्हा एकदा रियान परागला ट्रोल केलं. एका युझरने रियान परागकडे Attitude विराट कोहलीसारखा आहे. पण खेळतो मात्र रियान पराग सारखाच, असं उपहासाने म्हटलं आहे. रियान पराग आपल्या वर्तनामुळे यंदाच्या सीजनमध्ये दुसऱ्यांदा ट्रोल झाला आहे.
Riyan Parag has the attitude of Virat Kohli and the skill of Riyan Parag.#RCB #GTvsRR #RRvsGT pic.twitter.com/f7FgyxobXl
— Dhruv Agarwal (@dhruvagarwal710) May 24, 2022
परागची कृती अनेकांना पटली नव्हती
IPL 2022 च्या एका सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवला. प्लेऑफच्या दृष्टीने विजय दोन्ही संघांसाठी आवश्यक होता. पण राजस्थानने बाजी मारली. त्यावेळी सुद्धा रियान परागची कृती अनेकांना पटली नव्हती. त्यावेळी सुद्धा रियान परागने मैदानावर जी कृती केली, त्या नाटकाची काय गरज होती? असा प्रश्न क्रिकेट प्रेमींना पडला होता. फक्त क्रिकेट चाहतेच नव्हे, मैदानावर कॉमेंट्री करणारे कॉमेंट्रेटस, सोशल मीडियावरही रियानवर बरीच टीका करण्यात आली होती. लखनौच्या डावात 20 वी ओव्हर सुरु असताना हा प्रकार घडला होता. प्रसिद्ध कृष्णाच्या षटकात दुसऱ्या चेंडूवर रियानने जे केलं, त्याची काही गरज नव्हती.
— ChaiBiscuit (@Biscuit8Chai) May 24, 2022
आयपीएलमधून हटवण्याची मागणी झाली होती
त्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने लखनौच्या मार्कस स्टॉयनिसला चेंडू टाकला. स्टॉयनिसने फटका खेळल्यानंतर चेंडू हवेत उंच उडाला. रियान परागने झेल घेण्यात कुठलीही चूक केली नाही. पण त्यानंतर मनातला राग दाखवण्यासाठी त्याने चेंडू मैदानावर घासला, त्यावरुन सर्व वाद निर्माण झाला. सोशल मीडियाने रियान परागच्या या कृतीचा खास समाचार घेतला. काहींनी रियान परागला मूर्ख म्हटलं. काहींनी त्याला आयपीएलमधून हटवण्याची मागणी केली.