Gt vs Rr ipl 2022: : मिलर ठरला किलर, 3 बॉल 3 सिक्स, मॅच फिनिश गुजरात फायनलमध्ये

राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 6 विकेट गमावून 188 धावा करत गुजरात टायटन्सला विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य दिले. जोस बटलरने सर्वाधिक 89 धावांचे योगदान दिले. त्याने 56 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार मारले. डावाच्या शेवटच्या षटकात तो धावबाद झाला.

Gt vs Rr ipl 2022: : मिलर ठरला किलर, 3 बॉल 3 सिक्स, मॅच फिनिश गुजरात फायनलमध्ये
मिलर ठरला किलर, 3 बॉल 3 सिक्स, मॅच फिनिश गुजरात फायनलमध्येImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 11:44 PM

कोलकाता : आयपीएलच्या (IPL 2022) चालू सीझनमधील पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला गेला. यात गुजरातने आपला विजयीरथ कायम ठेवत थेट फायनमध्ये धडक मारली आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 6 विकेट गमावून 188 धावा करत गुजरात टायटन्सला विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य दिले. जोस बटलरने (Jos Butler)  सर्वाधिक 89 धावांचे योगदान दिले. त्याने 56 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार मारले. डावाच्या शेवटच्या षटकात तो धावबाद झाला. अटीतटीचा हा सामना शेवटच्या शटकापर्यंत पोहोचला होता. या सामन्याचा चांगलाच थरार यावेळी प्रेकांना अनुभवता आता. हरणाऱ्या संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे त्यामुळे राजस्थानच्या आशा अजूनही जिवंत आहे.

मिलरने ठोकली षटकारांची हॅट्ट्रिक, गुजरात थेट अंतिम फेरीत

डेव्हिड मिलरने प्रसिद्ध कृष्णाच्या शेवटच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर सहा षटकार ठोकले. यासह गुजरातने विजय मिळवत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. मिलर 38 चेंडूत 68 धावा काढून नाबाद परतला. त्याने 3 चौकार आणि 5 षटकार मारले. हार्दिक पांड्याने 27 चेंडूत 40 धावांच्या नाबाद खेळीत 5 चौकार लगावले.

कुणाची बॅटिंग चमकली?

या महत्वाच्या सामन्यात सुरूवातीला राजस्थानकडून जॉस बटलरने तुफान फटकेबाजी करत राजस्थानला मजबूत स्थितीत पोहोचवले. मात्र दुसऱ्या डावात गुजरातच्या विकेट सुरूवातीला कोसळत असताना हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलरने चांगली भागिदारी करत हा विजय खेचून आणला. सुरूवातील शांत खेळणारा डेव्हिड मिलरच राजस्थानसाठी किलर ठरला. त्याने शेवटी तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे अवघड दिसणार हा विजय गुजरातसाठी सोपा बनला.

हे सुद्धा वाचा

अश्विनने 4 षटकात 40 धावा दिल्या

ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आपल्या कोट्यातील शेवटच्या षटकात 14 धावा दिल्या. अश्विन खूप महागडा ठरला आहे आणि त्याने 4 षटकात 40 धावा दिल्या, ही सध्याच्या सीझनमधील त्याची सर्वात खराब कामगिरी आहे. गुजरातकडून बॅटिंगचा मोर्चा कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलरने सांभाळला. सुरूवातील गुजरातच्या विकेट लवकर पडल्यावर सामना फिरतोय असे वाटत असताना त्यांनी तुफान फटाकेाबाजी करत सामना जिवंत ठेवला.

चहलने 4 षटकात 32 धावा दिल्या, विकेट नाही

युझवेंद्र चहलच्या शेवटच्या षटकातील 5व्या चेंडूवर डेव्हिड मिलरने लाँग ऑनवर शानदार षटकार ठोकला. या षटकात एकूण 11 धावा झाल्या. चहलने आपल्या कोट्यातील 4 षटकात 32 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.