GT vs SRH IPL 2023 Score : गुजरात टायटन्सने हैदराबादचा पराभव करत बुक केलं प्ले-ऑफचं तिकीट

| Updated on: May 16, 2023 | 12:49 AM

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad IPL 2023 Score in Marathi : गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचणारा हा संघ पहिला संघ ठरला आहे.

GT vs SRH IPL 2023 Score : गुजरात टायटन्सने हैदराबादचा पराभव करत बुक केलं प्ले-ऑफचं तिकीट

मुंबई : आयपीएलमधील 62 वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात गुजरात संघाने 34 धावांनी विजय मिळवला. या विजयासह गुजरात यंदाच्या मोसमातील प्ले-ऑफमध्ये आपली जागा पक्की करणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 188 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघाल 20 षटकांत 154-9 धावाच करता आल्या.

गुजरात संघाने या विजयासह प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. आता शेवटचा सामना आरसीबीसोबत 21 मेला खेळवला जाणार आहे.

दोन्ही संघांची टीम 11

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (w), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (C), डेव्हिड मिलर, दासुन शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को यानसेन, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी, टी नटराजन

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 16 May 2023 12:46 AM (IST)

    गुजरातचं प्ले-ऑफमध्ये स्थान पक्क

    गुजरात टायटन्स संघाने सनराइजर्स हैदराबाद संघावर 34 धावांनी विजय मिळवला आहे. गुजरातकडून मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 4 बळी घेत विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली.

  • 15 May 2023 11:09 PM (IST)

    GT vs SRH : क्लासेन आऊट

    मोहम्मद शमी याने क्लासेनला बाद करत सामना गुजरात संघाच्या पारड्यात टाकला आहे. क्सासेन एकटी झुंज सुरू होती मात्र 64 धावांवर तो कॅचआऊट झाला.  या विकेटसह शमीने चार विकेट्स घेतल्या.

  • 15 May 2023 10:52 PM (IST)

    GT ve SRH :

    हेनरिक क्लासेन याने 33 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. यामध्ये त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

  • 15 May 2023 10:34 PM (IST)

    GT vs SRH

    हैदराबाद संघाच्या 59 धावांवर 7 विकेट्स पडल्या असून आता मैदानात क्लासेन आणि भुवनेश्वर खेळत आहेत. सनराईजर्स संघाला 111 धावांची 56 चेंडूंमध्ये गरज आहे.

  • 15 May 2023 09:50 PM (IST)

    GT vs SRH : अभिषेक शर्मा आऊट

    सनरायझर्स हैदराबादला दुसऱ्या षटकात अभिषेक शर्माच्या रूपाने 11 धावांवर दुसरा धक्का बसला. यश दयालने अभिषेकला वैयक्तिक 5 धावांवर बाद केले.

  • 15 May 2023 09:35 PM (IST)

    GT vs SRH Live Score :

    गुजरात टायटन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 188 धावा केल्या. धावसंख्या 220 पर्यंत जाईल असे वाटत असले तरी अखेरच्या षटकात हैदराबादने शानदार पुनरागमन केले. भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेतल्या. गुजरातकडून शुभमन गिलने 101 धावा केल्या असून त्याचं हे आयपीएलमधील पहिले शतक आहे.

  • 15 May 2023 08:51 PM (IST)

    GT vs SRH : साई सुदर्शन आऊट

    15 व्या षटकात, 147 धावांवर गुजरात टायटन्सची दुसरी विकेट पडली. साई सुदर्शन 47 धावा करून बाद झाला. मार्कोने सुदर्शनला झेलबाद केलं.

  • 15 May 2023 08:08 PM (IST)

    GT vs SRH : पॉवरप्ले गुजरात टायटन्सच्या नावावर

    पॉवरप्ले गुजरात टायटन्सच्या नावावर राहिला. 6 षटकांनंतर गुजरात टायटन्सची धावसंख्या एका विकेटवर 65 आहे. शुबमन गिल 16 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 36 धावांवर खेळत आहे. तर साई सुदर्शन 4 चौकारांसह 21 धावांवर खेळत आहे.

  • 15 May 2023 07:53 PM (IST)

    GT vs SRH : दासुन शनाका पदार्पण

    श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला आज पदार्पण करण्याची संधी मिळाली. याशिवाय यश दयालचेही संघात पुनरागमन झाले आहे. विजय शंकरला काल सराव सुरू असताना दुखापत झाली.

  • 15 May 2023 07:18 PM (IST)

    स्टार खेळाडू बाहेर

    गुजरात संघाचा ऑल राऊंडर खेळाडू विजय शंकर दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या जागी साई सुदर्शन याला संधी मिळाली आहे.

  • 15 May 2023 07:16 PM (IST)

    सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग 11

    सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी, टी नटराजन

  • 15 May 2023 07:13 PM (IST)

    गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग 11

    गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (w), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (C), डेव्हिड मिलर, दासुन शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद

  • 15 May 2023 07:05 PM (IST)

    हैदराबादने जिंकला टॉस

    सनराईजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार एडन मार्क्रमने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 15 May 2023 06:55 PM (IST)

    GT vs SRH : हेड टू हेड

    गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त दोनदा आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी 1-1 वेळा सामना जिंकला आहे.

Published On - May 15,2023 6:13 PM

Follow us
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.