TNPL 2023 मध्ये गुजरात टायटन्सच्या फलंदाजाची कमाल, 10 चेंडूत 450 च्या स्ट्राइक रेटने हाफ सेंच्युरी, VIDEO
TNPL 2023 मध्ये तो आतापर्यंत तीन सामने खेळलाय. तिन्ही मॅचमध्ये त्याने एकसारखच प्रदर्शन केलय. समोरच्या टीमची गोलंदाजी तो अगदी सहज फोडून काढतोय. त्याला रोखण जमत नाहीय.
चेन्नई : मॅच दुसरी, प्रतिस्पर्धी टीम दुसरी, पण फक्त बदलला नाही, तो त्याचा अंदाज. लागोपाठ शतक झळकवण्याचा त्याचा सिलसिला कायम आहे. TNPL 2023 मध्ये त्याने हाफ सेंच्युरीची हॅट्ट्रिक केलीय. IPL 2023 फायनलमध्ये त्याने जी कामगिरी केली, त्याचाच कित्ता तो तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये गिरवतोय. TNPL मध्ये सध्या एकाच खेळाडूची चर्चा आहे, त्याच नाव आहे साई सुदर्शन.
सध्या साई सुदर्शन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांना त्याला बॉलिग नेमकी कशी करायची? हा प्रश्न पडलाय.
तिन्ही सामन्यात एकसारखच प्रदर्शन
तामिळनाडू प्रीमियर लीगच्या चालू सीजनमध्ये आतापर्यंत साई सुदर्शन फक्त तीन सामने खेळलाय. तिन्ही सामन्यात त्याने एकसारखच प्रदर्शन केलय. तो प्रत्येक सामन्यात समोरच्या टीमची गोलंदाजी फोडून काढतोय. अहमदाबाद ते कोएंबटूर, कोएंबटूर ते डिंडीगुल प्रत्येक मैदानात साई सुदर्शन आपली स्क्रिप्ट लिहितोय.
थांबायच नाव घेत नाहीय
21 वर्षाच्या साई सुदर्शनच्या बॅटचा तडाखा 19 जूनला TNPL च्या मॅचमध्ये पहायला मिळाला. लाइक कोवई किंग्स आणि चेपॉक सुपर गिलीजमध्ये मॅच होती. हा सामना खूप लो स्कोरिंग होता. पण कमी धावसंख्येच्या या सामन्यात साई सुदर्शनने तशीच छाप उमटवली.
450 च्या स्ट्राइक रेटने 10 चेंडूत धावा
चेपॉक सुपरला विजयासाठी 127 धावांच टार्गेट मिळालं होतं. 3 नंबरवर फलंदाजीसाठी उतरलेल्या साई सुदर्शनने कोवई किंग्ससाठी नाबाद अर्धशतक झळकावलं. त्याने 43 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. त्याने 46 धावा 450 च्या स्ट्राइक रेटने 10 चेंडूत केल्या.
Unstoppable Sai Sudharsan smashes another 50* ?#TNPLonFanCode pic.twitter.com/SwtxMdZfJ9
— FanCode (@FanCode) June 16, 2023
त्याच्यामुळे आरामात मिळवला मोठा विजय
T20 क्रिकेटमधील साई सुदर्शनच हे सलग चौथ अर्धशतक आहे. TNPL मधील त्याच हे सलग तिसरी हाफ सेंच्युरी आहे. साईने TNPL मध्ये आतापर्यंत 3 सामने खेळलेत. तिन्ही मॅचमध्ये त्याच्या नावावर हाफ सेंच्युरी आहेत. याआधी IPL 2023 च्या फायनलमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं होतं. साई सुदर्शनच्या हाफ सेंच्युरीच्या बळावर कोवई किंग्सने चेपॉक सुपरवर 8 विकेट आणि 21 चेंडू बाकी राखून विजय मिळवला.