Gujarat Titans vs Lucknow Super Giants Playing XI IPL 2022: गुजरात-लखनौमध्ये कांटे की टक्कर, अशी असेल प्लेईंग इलेव्हन!

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सकडे काही शानदार खेळाडू आहेत. त्यामुळे या दोन संघांची टक्कर जोरदार होऊ शकते. गुजरात टायटन्ससाठी शुभमन गिल सलामीला उतरेल, परंतु त्याच्यासोबत दुसरा सलामीवीर कोण असेल हे अद्याप कळू शकलेलं नाही.

Gujarat Titans vs Lucknow Super Giants Playing XI IPL 2022: गुजरात-लखनौमध्ये कांटे की टक्कर, अशी असेल प्लेईंग इलेव्हन!
Hardik Pandya - KL RahulImage Credit source: Gujarat Titans, Lucknow Super Giants
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 12:20 PM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मधला चौथा सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (Gujarat Titans vs Lucknow Super Giants) या दोन नवीन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. सोमवारी (28 मार्च रोजी) हा सामना खेळवला जाईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून गुजरात आणि लखनऊ यांच्यात हा सामना होईल. हे दोन्ही आयपीएलमधले नवीन संघ आहेत आणि आपापला पहिलाच सामना खेळणार आहेत. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. दुसरीकडे, केएल राहुल हा लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधार म्हणून दिसणार आहे. या स्पर्धेतील हा त्याचा दुसरा संघ आहे. याआधी तो बराच काळ मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्याचबरोबर केएल राहुलने दोन हंगामात पंजाब किंग्जचे कर्णधारपद सांभाळले आहे. लखनौ हा त्याचा चौथा संघ आहे. तो याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचाही भाग होता.

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सकडे काही शानदार खेळाडू आहेत. त्यामुळे या दोन संघांची टक्कर जोरदार होऊ शकते. गुजरात टायटन्ससाठी शुभमन गिल सलामीला उतरेल, परंतु त्याच्यासोबत दुसरा सलामीवीर कोण असेल हे अद्याप कळू शकलेलं नाही. गुजरातची मधली फळी मजबूत आहे. कारण मधल्या फळीत त्यांच्याकडे डेव्हिड मिलर, विजय शंकर, हार्दिक पंड्या आणि ऋद्धीमान साहासारखे अनुभवी फलंदाज आहेत. तर गुजरातचं गोलंदाजी आक्रमण मोहम्मद शमी, राशिद खान आणि लॉकी फर्ग्युसन सांभाळतील.

आयपीएलमधील सर्व 10 संघांपैकी लखनौचा संघ कागदावर सर्वात मजबूत दिसतोय. सर्वात जास्त अष्टपैलू खेळाडूंचा भरणा याच संघाकडे आहे. लखनौकडून कर्णधार राहुल आणि दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज क्विंटन डीकॉक सलामीची जबाबदारी सांभाळतील. मधल्या फळीत त्यांच्याकडे मार्कस स्टॉयनिस, मनिश पांडे, कृणाल पंड्या आणि दीपक हुड्डासारखे आक्रमक फलंदाज आहेत. तर लखनौचं गोलंदाजी आक्रमण आवेश खान, अँड्र्यू टाय आणि रवी बिष्णोई सांभाळतील.

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, रहमानउल्ला गुरबाज, अभिनव मनोहर, विजय शंकर, ऋद्धिमान साहा, राशिद खान, डेव्हिड मिलर, आर साई किशोर, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, मार्कस स्टॉयनिस, रवी बिश्नोई, आवेश खान, अँड्र्यू टाय.

लखनौ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ

केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, दीपक हुडा, कृणाल पांड्या, आवेश खान, अंकित राजपूत, कृष्णप्पा गौतम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मोहसिन खान, आयुष खान बधोनी, काईल मेयर्स, कर्ण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव आणि बी साई सुदर्शन.

गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार) शुभमन गिल, साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकीरत सिंग मन्नू, मॅथ्यू वेड, ऋषिमन साहा, रहमानउल्ला गुरबाज, विजय शंकर, राहुल तेवतिया, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, वरूण यादव, राशिद खान, वरुण अॅरोन, दर्शन नळकांडे, यश दयाल, प्रदीप सांगवान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, लॉकी फर्ग्युसन, रवी श्रीनिवासन साई किशोर.

इतर बातम्या

Mumbai Indians च्या Murugan Ashwin ने टिम सायफर्टची दांडी उडवली तो अप्रतिम गुगली चेंडू एकदा पहाच VIDEO

IPL 2022 Mumbai Indians Jasprit Bumrah ला काय झालय? इतकी वाईट बॉलिंग त्याने कशी केली?

Rohit Sharma Fined, IPL 2022: Mumbai Indians ला दुहेरी फटका, रोहितला भरावा लागला 12 लाखाचा दंड

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.