India Vs Ireland : आर्यलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या कॅप्टन, पंतला आराम, संपूर्ण टीम एका क्लिकवर

या मालिकेसाठी सनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर युवा संघाला यात मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे आपली छाप सोडण्याची नव्या खेळाडुंसाठी हे एक मोठं व्यासपीठ असणार आहे.

India Vs Ireland : आर्यलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या कॅप्टन, पंतला आराम, संपूर्ण टीम एका क्लिकवर
आर्यलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या कॅप्टन, पंतला आरामImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 9:38 PM

मुंबई : क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी (India Vs Ireland) टीम इंडियाची घोषणा केली आहे. हार्दिक पांड्याला (Hardik Pandhya) भारतीय संघाचा कर्णधार (Team India) बनवण्यात आले आहे. तर भुवनेश्वर कुमारला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या मालिकेत ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे, तर सूर्यकुमार यादवचे पुनरागमन झाले आहे. टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यापूर्वी आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. हे दोन सामने 26 आणि 28 जून रोजी होणार आहेत. या मालिकेसाठी सनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर युवा संघाला यात मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे आपली छाप सोडण्याची नव्या खेळाडुंसाठी हे एक मोठं व्यासपीठ असणार आहे. हे सामने भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता प्रसारित केले जातील.

बीसीसीआयचं ट्विट

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, अशी टीम असणार आहे.

हार्दिक पांड्याला मोठं गिफ्ट

T20 विश्वचषक 2021 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या हार्दिक पांड्याने IPL 2022 मध्ये जोरदार पुनरागमन केले. हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली आणि त्याच्या संघाला पहिल्याच वर्षी आयपीएलमध्ये विजेते बनवले. हार्दिकला या कामगिरीचं मोठं बक्षीस मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या मालिकेत हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले होते, तर आता आयर्लंड दौऱ्यात त्याच्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.

युवा खेळाडुंना मोठी संधी

आयर्लंडसारख्या संघाविरुद्ध टीम इंडियाने एक प्रकारे आपली बी-टीम मैदानात उतरवली आहे, परंतु जर तुम्ही या संघावर नजर टाकली तर ज्या आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू खेळतात त्यामध्ये बहुतेक खेळाडू हे मोठे स्टार आहेत. याच कामगिरीच्या जोरावर राहुल त्रिपाठीची टीम इंडियात निवड झाली आहे. संजू सॅमसनचे टीम इंडियात पुनरागमन झाले असतानाच, आफ्रिका मालिकेत त्याची निवड न झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

पंतला विश्रांती

याशिवाय सूर्यकुमार यादवनेही दुखापतीनंतर टीम इंडियात पुनरागमन केले आहे. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंतला विश्रांती मिळाली नाही आणि त्याला कर्णधार बनवण्यात आले, आता त्याला विश्रांती मिळाली आहे. कारण यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध टी-20, कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.