Vijay Hazare Trophy Final 2023 : विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरियाणाकडून राजस्थानचा पराभव

Haryana Win Vijay Hazare Trophy Final 2023 : विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये राजस्थान संघाचा पराभव झाला आहे. हरियाणा संघाने केलेल्या दमदार प्रदर्शनासमोर राजस्थानचा निभाव लागला नाही. हरियाणा संघाने प्रथमच विजय हजारे ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

Vijay Hazare Trophy Final 2023 : विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरियाणाकडून राजस्थानचा पराभव
Vijay Hazare Trophy Final 2023
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 10:31 PM

मुंबई | विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरियाणाने संघाने राजस्थानचा पराभव केला आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर फायनल सामना पार पडला. हरियाणा संघाने टॉस जिंकत प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना हरियाणाने 50 ओव्हरमध्ये 287-5 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 257 धावांवर ऑल आऊट झाला. हरियाणा संघाने फायनल सामना 30 धावांनी विजय मिळवला आहे.

हरियाणा संघाचा डाव

हरियाणा संघ बॅटींगला उतरला तेव्हा काही खास सुरवात करू शकला नाही. दुसऱ्याच ओव्हरमध्ये युवराज सिंह १ धाव करून परतला होता. त्यानंतर हिमांशू राणा 20 धावा काढून बाद झाला. तिसऱ्या विकेटसाठी हरियाणा संघाकडून अंकित कुमार आणि अशोक मेनारिया यांनी संघाचा डाव सावरला होता. संघाला संकटातून बाहेर काढत चांगली भागादारी केलेली. राजस्थान संघाला तिसऱ्या विकेटसाठी 35 व्या ओव्हरची वाट पाहावी लागली.

राजस्थान संघाला अनिकेत चौधरी याने आणखी एकदा यश मिळवून देत सामन्यात कमबॅक करून दिलं. अंकित कुमार याला ८८ धावांवर बोल्ड केलं. त्याच्यापाठोपाठ अशोक मेनारियाही ७० धावांवर बाद झाला. त्यानंतर कोणतीही मोठी भागीदारी झाली नाही. रोहित शर्मा २० धावा, निशांत सिंधू २९ धावा, राहुल तेवतिया २४ धावा आणि शेवटला सुमित कुमार याने नाबाद २८ धावांची आक्रमक छोटेखानी खेळी करत संघाची धावसंख्या 280 च्या वर पोहोचवली. राजस्थान संघाकडून अनिकेत चौधरीने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर अराफत खानने २ विकेट आणि राहुल चहरने १ विकेट घेतली.

राजस्थानचा डाव

या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी  उतरलेल्या राजस्थानची सुरूवातही खराब झालेली, सलामीवीर राम चौहान याला सुमित कुमार याने बोल्ड करत पहिला धक्का दिलेला. त्यानंतरही दोन मोठ्या विकेट घेत सुमितने राजस्थान संघाला बॅकफूटवर ढकललं होतं. माहिपाल लोमरोर १ धाव, कॅप्टन दिपक हुड्डालाही सुमितने माघारी आऊट केलं. १२ धावांवर राजस्थान संघाच्या तीन विकेट गेल्या होत्या.

करन लाम्बा आणि अभिजीत तोमर यांनी डाव सावरला असं वाटत असताना राहिल तेवतियाने लाम्बाला बोल्ड करत चौथा धक्का दिला. त्यानंतर अभिजीत तोमर आणि कुणाल सिंह राठोर यांच्यात चांगली भागीदारी पाहायला मिळाली. दोघे सामना जिंकवतात असं वाटलं होतं मात्र तसं काही झालं नाही. हर्षल पटेल याने तोमर याला ८० धावांवर असतानाबाद करत हरियाणाला सामन्यात कमबॅक करून दिलं. त्यानंतर कोणतीही भागीदारी पाहायला मिळाली नाही. अवघ्या ५७ धावांमध्ये पाच विकेट गमावलेल्या राजस्थान संघाचा फायनलमध्ये पराभव झाला. हरियाणाकडून सुमित कुमार आणि हर्षेल पटेल यांनी सर्वाधिक तीन तर राहुल तेवतिया आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

हरियाणा (प्लेइंग इलेव्हन): युवराज सिंग, अंकित कुमार, हिमांशू राणा, निशांत सिंधू, रोहित परमोद शर्मा (w), राहुल तेवतिया, अशोक मेनारिया (C), सुमित कुमार, हर्षल पटेल, अमित राणा, अंशुल कंबोज.

राजस्थान (प्लेइंग इलेव्हन): अभिजीत तोमर, राम मोहन चौहान, महिपाल लोमरोर, दीपक हुडा (C), करण लांबा, कुणाल सिंग राठोर (W), राहुल चहर, अनिकेत चौधरी, अराफत खान, खलील अहमद, कुकना अजय सिंग

टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी.
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?.
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे.
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका.
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला.