Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: David warner वर वीरेंद्र सेहवागचे गंभीर आरोप, धक्कादायक माहिती उघड

IPL 2022: "काही वेळेला तुम्ही एखाद्या खेळाडूला धडा शिकवण्यासाठी बाहेर ठेवता. तो नवीन होता. तू एकटाच संघासाठी महत्त्वाचा नाही, इतर खेळाडू सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत, हे दाखवून देणं आवश्यक होतं"

IPL 2022: David warner वर वीरेंद्र सेहवागचे गंभीर आरोप, धक्कादायक माहिती उघड
david-warner Image Credit source: ipl/twitter
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 5:52 PM

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender sehwag) दिल्लीचा फलंदाज डेविड वॉर्नरच्या वर्तनाबद्दल धक्कादायक माहिती उघड केली आहे. सेहवागच्या मते डेविड वॉर्नर (David warner) एक आदर्श व्यावसायिक खेळाडू नाही. वॉर्नरच क्रिकेटवर जास्त लक्ष नव्हतं, तो पार्ट्या जास्त करायचा असं, सेहवागने म्हटलं आहे. डेविड वॉर्नरने 2009 सालापासून दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळायला सुरुवात केली. चार सीजन खेळल्यानंतर 2013 मध्ये वॉर्नरला दिल्लीने रिलीज केलं. त्यावेळी सेहवान दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कॅप्टन होता. आता हाच संघ दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) म्हणून ओळखला जातो. “मी सुद्धा माझा राग काही खेळाडूंवर काढायचो. डेविड वॉर्नर त्यापैकी एक होता. जेव्हा तो नव्याने संघात आला होता, तेव्हा तो सराव, सामन्यांपेक्षा पार्ट्या जास्त करायचा. पहिल्यावर्षी त्याची काही खेळाडूंबरोबर भांडण झाली” असं सेहवागने सांगितलं.

तू एकटाच संघासाठी महत्त्वाचा नाही

“काही वेळेला तुम्ही एखाद्या खेळाडूला धडा शिकवण्यासाठी बाहेर ठेवता. तो नवीन होता. तू एकटाच संघासाठी महत्त्वाचा नाही, इतर खेळाडू सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत, हे दाखवून देणं आवश्यक होतं. अन्य खेळाडू सुद्धा टीमसाठी खेळतात व मॅच जिंकवून देतात. त्यामुळे आम्ही त्याला बाहेर बसवलं व मॅच सुद्धा जिंकलो” असं सेहवगाने सांगितलं.

SRH विरुद्ध खेळण्यासाठी वेगळी प्रेरणा लागत नाही

डेविड वॉर्नर जागतिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन करणारा फलंदाज आहे. प्रत्येक आयपीएल सीजनवर त्याने वर्चस्व गाजवलं आहे. मागच्या सामन्यात दिल्लीकडून खेळताना न्यू साऊथ वेल्सच्या या आक्रमक फलंदाजने SRH विरुद्ध 92 धावांची खेळी केली. सामनावीराचा पुरस्कार पटकावून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर त्याची कामगिरी आणि रोव्हमॅन पॉवेल सोबतच्या फलंदाजीवर त्याने भाष्य केलं. “खेळपट्टी खरोखरच चांगली होती. मला इथे यश मिळालं आहे. मी इथे माझ्या पद्धतीचं क्रिकेट खेळलो, तर फायदा होईल, हे मला माहित होतं” असं सेहवाग म्हणाला. “रोव्हमॅन पॉवेल सोबत खेळणं खरोखरच एक आनंददायी अनुभव होता. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळण्यासाठी मला वेगळी प्रेरणा लागत नाही” असं वॉर्नर म्हणाला.

त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.