IPL 2022: ‘कॅप्टन झाल्यानंतर रोहितचे केस पिकले’, Mumbai Indians पोस्ट केला खास VIDEO
कॅप्टन म्हणून क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये उत्तम प्रदर्शन केल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) आता IPL 2022 स्पर्धेकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.

मुंबई: कॅप्टन म्हणून क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये उत्तम प्रदर्शन केल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) आता IPL 2022 स्पर्धेकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावलं आहे. मंगळवारी रोहित मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला. त्यावेळी त्याने मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कोचिंग आणि सपोर्ट स्टाफची भेट घेतली. रोहितचं यावेळी कोचिंग स्टाफने जोरदार स्वागत केलं. श्रीलंकन कोच माहेला जयवर्धने यांनी रोहितला वेलकम करताना मिठी मारली. त्यावेळी त्यांनी केलेल्या एका कमेंटवर सगळेच खळखळू हसले. रोहितने कोचिंग स्टाफची भेट घेतल्याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये ‘कर्णधार बनल्यानंतर रोहितचे केस आता पिकले’, असं जयवर्धने बोलताना व्हिडिओमध्ये दिसतात.
रोहित शर्माला आधी टी 20 आणि वनडेच कॅप्टन बनवण्यात आलं होतं. पण विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेनंतर तडकाफडकी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रोहितकडेच टेस्ट कॅप्टनशिपची जबाबदारी सोपवण्यात आली. रोहितने वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दमदार विजय मिळवले.
Always something special about catching up with faMIliar faces! ??#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 @MahelaJay @ShaneBond27 MI TV pic.twitter.com/Zi1KME46e7
— Mumbai Indians (@mipaltan) March 15, 2022
वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेपासून सुरु झालेला विजयी प्रवास कसोटी मालिकेपर्यंत कायम आहे. टी 20 च्या मायदेशात खेळल्या गेलेल्या 17 पैकी 16 सामन्यांमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने विजय मिळवला. टी 20 चा कॅप्टन म्हणून रोहितच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत भारताने 24 पैकी 22 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.